भारतीय तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी मोदी यांना मदत करु - चीन

त्याचसोबत रोजगार बाबत सुरु असलेला असंतोष चीनसाठी उत्तम नसल्याचे म्हटले आहे.

Narendra Modi and Xi Jinping (Photo Credits- Twitter)

सध्या भारतात (India) तरुणांना नोकऱ्या मिळताना मुश्किल झाले आहे. तत्पूर्वी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भारतीय तरुणांना रोजगार मिळवून देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र मोदींचे हे आश्वासन फोल ठरत असून अद्याप बहुतांश तरुण बेरोजगार असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र मोदी सरकारच्या मदतीला चीन धावून येत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे चीन (China) सरकारचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्स (Global Times) मध्ये एका रिपोर्टनुसार चीन देश भारताला मदत करु पाहत आहे. त्याचसोबत रोजगार बाबत सुरु असलेला असंतोष चीनसाठी उत्तम नसल्याचे म्हटले आहे.

या रिपोर्ट्सनुसार, डोकलामा मधील सैनिक आणि भारतातील सैनिकांच्या एका वर्षाच्या वादानंतर दोन्ही देशांच्या नात्यात सुधारणा होत आहे. भारतामधील केंद्र सरकार कमजोर असून तेथील जनसंख्येत विविधता आहे. त्यामुळे मोदी यांनी त्यांची सामाजिक प्रतिमा सुधारावी असे चीनचे म्हणणे आहे. त्याचसोबत सुधारणेमुळे चीन आणि भारताचे आर्थिक संबंध मजबूत होण्याची शक्यता आहे. (रिपोर्ट: चीन- पाकिस्तान भ्रटाचार करण्यात अव्वल, जगातील भ्रष्ट देशांची नावे जाहीर)

भारत सध्या धर्मसंकटात असल्याचे या वृत्तपत्राच्या रिपोर्ट्समध्ये सांगितले आहे. परंतु जर दिल्ली चीनच्या निवेदनावर बंदी आणत असेल तर नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता खूप कमी होईल.