बिअरला 'गणेश' नाव दिले, भारतीयांनी वक्त केला संताप

इंग्लंडच्या विशबोन ब्रुअरी लिमिटेड या मद्यविक्री करणाऱ्या कंपनीने बिअरला चक्क 'गणेश' हे नाव दिले.

फोटो सौजन्य - फेसबुक

इंग्लंडच्या विशबोन ब्रुअरी लिमिटेड या मद्यविक्री करणाऱ्या कंपनीने बिअरला चक्क 'गणेश' हे नाव दिले. त्यामुळे भारतीयांनी या कंपनी विरोधात संपात व्यक्त करुन त्यांच्यावर जोरदार टीका केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी मॅनचॅस्टरमध्ये बिअर उत्सवाचे आयोजन केले होते. या उत्सवाच्या वेळी भारतीय नागरिकांना या नव्या बिअरकडे आकर्षित करण्यासाठी फळे आणि भाज्यांपासून ही बिअर बनविण्यात आली होती. भारतीय नागरिकांना या विदेशी कंपनीने बिअर तयार करण्याचा हा फंडा आवडला, परंतु त्या बॉटलवरील गणेश हे नाव पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही बाब लक्षात आल्यावर या कंपनीचे मुख्य अड्रीयन चॅपमेन यांनी हिंदू नागरिकांची माफी मागितली आहे. तसेच भारतामध्ये गणेश हा शब्द लोकप्रिय असल्याने आम्ही त्याला ते नाव दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तर कंपनीला कोणत्याही धर्माच्या भावना दुखवण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच येत्या पुढील काळात अशा पद्धतीची कोणतीही चूक होणार नाही याचे आश्वासन कंपनीचे मुख्य अड्रीयन चॅपमन यांनी दिले आहे.