Boris Johnson Plans to Resign: सध्याच्या पगारात भागत नसल्याने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन राजीनामा देण्याच्या तयारीत; जाणून घ्या त्यांची Salary
एका खासदाराचे म्हणणे आहे की, घटस्फोटाच्या कराराचा भाग म्हणून बोरिस यांना त्यांची माजी पत्नी मरीना व्हीलर यांनाही पैसे द्यावे लागतात.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (British Prime Minister Boris Johnson) पुढच्या वर्षाच्या मार्चनंतर राजीनामा (Resign) देण्याचा विचार करीत आहेत. त्यांच्या आधीच्या व्यवसायाच्या तुलनेत सध्याच्या 150,402 पाउंड पगार अतिशय कमी असल्याने या पगारात त्यांचे भागू शकत नाही. यामुळेच ते ब्रिटनचे पंतप्रधानपद सोडण्याची तयारी करत आहेत. ब्रिटिश टॅबलोइड डेली मिररच्या मते, आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर एका टोरी खासदाराचा असा विश्वास आहे की, जॉन्सन वृत्तपत्रातील स्तंभलेखक म्हणून महिन्याला £ 23,000 कमवायचे.
बोरिस यांना सहा मुले असून, त्यातील काही इतकी लहान आहे की त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. एका खासदाराचे म्हणणे आहे की, घटस्फोटाच्या कराराचा भाग म्हणून बोरिस यांना त्यांची माजी पत्नी मरीना व्हीलर यांनाही पैसे द्यावे लागतात. टोरी पार्टीचे नेते होण्यापूर्वी पंतप्रधान बोरिस टेलिग्राफसमवेत वर्षाकाठी 275,000 पाउंड पगारावर होते आणि दोन भाषणे देऊन ते एका महिन्यात 160,000 पाउंडची कमाई करायचे.
खासदार पुढे म्हणाले की, ब्रिटीश पंतप्रधानांचा असा विश्वास आहे की, पंतप्रधान होण्याच्या काही दिवस आधी महिन्यात दोन भाषणांद्मवारे कमावलेल्या 2,06,885 पाउंडपेक्षा ते दुप्पट कमवू शकतील. बोरिस जॉनसन यांनी राजीनामा दिला तर, ब्रिटनचे कुलपती ऋषी सुनाकम (Rishi Sunak) यांची लोकप्रियता देशात वाढत गेली असल्याने, ते पंतप्रधान होण्यासाठी बुकींचे आवडते दावेदार आहेत. (हेही वाचा: Covid-19 चा संसर्ग रोखण्यासाठी युके सरकारच्या नव्या नियमावली मध्ये सेक्स बॅन; जोडप्यांसाठी कडक नियम)
दरम्यान, सध्या ब्रिटन कोरोना विषाणू महामारीशी लढत आहे. यूकेमध्ये 24 तासांत कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रकरणामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. देशात एकाच दिवसात रुग्णांची संख्या 16,982 पार झाली आहे. रविवारी इथे कोरोनामुळे मृतांचा आकडा 67 च्या वर गेला आहे. यूकेमध्ये रूग्णांच्या संख्येच्या बाबतीत हा एक नवीन विक्रम आहे.