भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानपासून वेगळे होण्यासाठी बलुचिस्तानने मागितली मदत

बर्‍याच काळापासून पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मिळावे अशी मागणी आहे, त्यांनी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी भारतीय जनतेला अभिवादन केले आहे. यासोबत बलुचिस्तान येथील नागरिकांनी 15 ऑगस्ट रोजी त्यांना पाकिस्तानमधून मुक्त करण्यासाठी भारत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

The BRP also held an awareness camp outside UN at the Broken Chair and make the people aware of growing human rights violations in Balochistan. (Image: PTI/File)

भारत आज आपला 73 वा स्वातंत्र्य दिन (73 rd Independence Day) साजरा करीत आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानमध्येही 'जय हिंद' च्या घोषणा दिल्या जात आहेत. पाकिस्तानचा भाग समजल्या जाणाऱ्या बलुचिस्तान (Balochistan), ज्याची बर्‍याच काळापासून पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मिळावे अशी मागणी आहे, त्यांनी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी भारतीय जनतेला अभिवादन केले आहे. यासोबत बलुचिस्तान येथील नागरिकांनी 15 ऑगस्ट रोजी त्यांना पाकिस्तानमधून मुक्त करण्यासाठी भारत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

काश्मीरमधील कलम 370 हटविल्यापासून, बलुचिस्तान भारत सरकारकडे पाकिस्तानपासून वेगळे व्हावे यासाठी सहकार्याची मागणी करत आहे. #BalochistanSolidarityDay नावाने सोशल मीडियावर ट्रेंड व्हायरल होत आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार बलुच कार्यकर्ते अट्टा बलोच यांनी म्हटले आहे की, ‘मी माझ्या भारतीय बंधू-भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. गेल्या 70 वर्षात भारताने मिळवलेले यश प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. भारतीयांची एकता आणि मदतीबद्दल आम्ही बलूच त्यांचे आभारी आहोत. आता स्वतंत्र बलुचिस्तानसाठी त्यांनी आवाज उठवावा अशी आमची इच्छा आहे. आम्हाला पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी भारताच्या समर्थनाची आवश्यकता आहे. धन्यवाद आणि जय हिंद.’  (हेही वाचा: पाकिस्तान मध्ये Indian High Commission मध्येही साजरा झाला भारताचा 73 वा स्वातंत्र्य दिन सोहळा; पहा या सेलिब्रेशनचे फोटो)

दरम्यान, 1948 पासून बलुचिस्तान पाकिस्तानी व्यापार्‍याविरूद्ध लढा देत आहे. बलुचिस्तान नेहमीच 11 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळाल्याचा दावा करत आला आहे. पण पाकिस्तानने हा त्यांचा भाग म्हणून त्यावर कब्जा केला आहे. पाकिस्तानी सैन्याने अनेकवेळा बलोच चळवळ किंवा आंदोलने बंद पडली आहेत. सध्या बलुचिस्तान हा दक्षिण पश्चिम पाकिस्तान, इराणचा दक्षिणपूर्व प्रांत सीस्तान आणि अफगाणिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतापर्यंत विस्तारलेला आहे. परंतु त्याचा बहुतांश भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now