Children Survey : मुले म्हणतायत, 'मोबाईल नसले तर जास्त आनंदी'; अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरच्या सर्व्हेत आश्चर्यकारक माहिती
अमेरिकेत नुकताच एक सर्व्हे झाला. ज्यात 72% किशोरवयीन मुलांनी सांगितले की, ते स्मार्टफोनपासून दूर राहून आनंदीत आहेत. प्यू रिसर्च सेंटरकडून सर्वे करण्यात आला. ज्यामुळे आता भारतातील पालकांनी सतर्क होण्याची गरज आहे.
Children Survey : लहान मुलांचे मोबाइलचे व्यसन आजकाल आपण सगळीकडेच पाहतो. जास्त मोबाईल पाहणे आरोग्यासाठी हानीकारक असते. विशेषत: किशोरवयीन (teenager) मुले मोबाईलच्या जास्त आहारी जात असल्याच्या तक्रारी अनेक पालकांकडून येत असतात. भारतात एकीकडे अशी परिस्थीती असताना अमेरीका सारख्या देशात मात्र लहान मुलांची मोबईल विषयीची माणसीकता बदलली आहे. नुकत्याच पार पडलेल्या सर्वेतून समोर आले आहे की, अमेरिकेतील (America) लहान मुलांना जास्त मोबाईलचे वेड नाही. त्यांना मोबाईल नसेल तर जास्त आनंद आणि समाधान मिळतो. हे वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल. पण, हो हे खरं आहे. अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरमध्ये (Pew Research Center) लहान मुलांवर होणाऱ्या डिजिटल मीडियाचा प्रभाव या विषयावर सर्व्हे करण्यात आला. त्या सर्व्हेमध्ये चार पैकी तीन किशोरवयीन मुलांनी आपल्याजवळ स्मार्टफोन नसेल तर जास्त आनंद आणि समाधान मिळत असल्याचे सांगितले.(हेही वाचा:Penis Erection Survey: नियमित इरेक्शनने पुरुषांचे लैंगिक आरोग्य सुधारते, जाणून घ्या अधिक माहिती)
अमेरिकतील 13 ते 17 वयोगटातील जवळपास 1500 किशोरवयीन मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा प्यू रिसर्च सेंटरकडून सर्वे करण्यात आला. त्याचे निष्कर्ष आता समोर आले आहे. त्या निष्कर्षानुसार 72% किशोरवयीन मुलांनी सांगितले की, त्यांच्याकडे स्मार्टफोन नसताना त्यांना शांतता वाटते, आनंद मिळतो. परंतु 44% मुले फोन नसताना चिंताग्रस्त होतात, त्यांना करमणूकीचे साधन मिळत नाही. त्यातील 40% मुले फोन नसताना अस्वस्थ होतात. 39% मुलांना एकाकी वाटते. तर काहींनी असे सांगितले की, छंद आणि आवड स्मार्टफोनमुळे चांगल्या प्रकारे जोपासला जाऊ शकतो. स्मार्टफोनमुळे ते सोपे होत असल्याचे 69% किशोरवयीन मुलांचे म्हणणे आहे.(हेही वाचा:Age Related Sexual Survey: वाढत्या वयासोबत बदलते लैंगिक जोडीदाराची संख्या; काय सांगतोय सर्व्हे? घ्या जाणून)
कित्येक पालक त्यांच्या मुलांना स्मार्टफोन, टीव्हीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यात अमेरिकेतील पालक काहीश्या प्रमाणत यशस्वी झाले असल्याचे अंशत: दिसत आहे. कारण, दहापैकी चार पालक आणि किशोरवयीन मुलांमध्ये फोनवरून वाद होतायत. मुलांच्या मते पालक त्यांच्यावर लक्ष कमी देतात. त्यांचे लक्ष जास्तवेळ स्मोर्टफोनवर असते. या विषयावर त्यांचे एकमेकांशी नियमितपणे वाद होत असल्याची तक्रार मुलांची आहे. जवळजवळ 46% किशोरवयीन म्हणतात की त्यांचे पालक त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांच्या फोनमुळे त्यांचे लक्ष विचलित होते.
तर, काही मुलांनी स्मार्टफोनचे फायदे अधिक असून त्यामुळे नुकसान कमी असल्याचे म्हटले आहे. सातपैकी दहा किशोरवयीन मुलांचे म्हणणे आहे की, स्मार्टफोन त्यांच्या वयाच्या मुलांसाठी नुकसानीपेक्षा फायदे देणार आहे. परंतु 30% मुले स्मार्टमुळे फायद्यापेक्षा नुकसान जास्त असल्याचे मत व्यक्त करतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)