टांझानियातील भारतीय अब्जाधीश बेपत्ता; तपासकार्यावर करोडोंचा खर्च ?

आफ्रिकेतील या सर्वात तरुण अरबपतीचे अज्ञात बंदुकधाऱ्यांनी, गुरुवारी टांझानियातील प्रमुख आर्थिक शहर दार एस सलाम येथे अपहरण केले आहे.

अरबपति मोहम्‍मद देवजी ( Photo Credit: Facebook )

जगाला चक्रावून टाकेल अशी घटना टांझानियाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. नुकतीच चीनची सर्वात श्रीमत अभिनेत्री बिंगबिंग गायब झाल्याची घटना ताजी असताना आता आफ्रिकेचे एक अरबपतीदेखील गायब झाले आहेत. तर हे अरबपती स्वतः गायब झाला नसून, आफ्रिकेतील या सर्वात तरुण अरबपतीचे अज्ञात बंदुकधाऱ्यांनी, गुरुवारी टांझानियातील प्रमुख आर्थिक शहर दार एस सलाम येथे अपहरण केले आहे. मोहम्मद देवजी असे या अरबपतीचे नाव असून ते 43 वर्षांचे आहेत. मूळ भारतीय असलेले देवजी आपल्या हॉटेलच्या जिममध्ये प्रवेश करत असताना ही घटना घडली. देवजी हे MeTL ग्रुपचे अध्यक्ष असून, त्यांचा 10 देशांमध्ये विमा, वाहतूक, लॉजिस्टिक आणि खाद्यपदार्थांचा व्यवसाय आहे.

दार-ए-सलाम चे गव्हर्नर पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 गाड्यांमधून आलेले हे गोरे लोक होते. सुरुवातीला त्यांनी हवेत गोळीबार केला आणि त्यानंतर लगेच देवजी यांचे अपहरण करण्यात आले. अपहरकर्त्यांसाठी जिमच्या दिशेकडील गेट जाणूनबुजून उघडे ठेवण्यात आले होते अशीही शंका व्यक्त केली जात आहे. हे कृत्य विदेशी राष्ट्राने केले असावे अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत.

2013साली देवजी जगप्रसीद्ध फोर्ब्स मासिकाच्या कव्हरपेजवर झळकले होते. या मासिकाने त्यांची संपत्ती 1.5 अब्ज डॉलर असल्याचे जाहीर करून ते टांझानियामधील एकमेव अब्जाधीश असल्याची घोषणाही केली होती. 2015मध्ये फोर्ब्सने त्यांना ‘पर्सन ऑफ द ईयर’ म्हणून निवडले होते. तसेच देवजी यांनी त्यांची अर्धी संपत्ती दान करणार असल्याची घोषणा 2016 साली केली होती.



संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

White House Press Secretary: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! 27 वर्षीय कॅरोलिन लेविट यांची व्हाईट हाऊसच्या सर्वात तरुण प्रेस सेक्रेटरी म्हणून नियुक्ती

Ban ISKCON or We Will Kill Devotees: 'इस्कॉनवर बंदी घाला नाहीतर आम्ही भाविकांना मारून टाकू'; इस्लामी गटाचा Muhammad Yunus सरकारला अल्टिमेटम (Video)

New Zealand MP Performs Haka Dance In Parliament: न्यूझीलंडच्या खासदार हाना रावहितीने सभागृहात केला 'हाका डान्स'; विधेयकाची प्रतही फाडली (Watch Video)

Lahore Smog Crisis Deepens: लाहोरमध्ये विषारी हवा, धुक्याने घुसमटले नागरिकांचे श्वास; एका दिवसात 15,000 हून अधिक प्रकरणे नोंद, NASA ने टिपाला फोटो