Indian-Origin Man Killed in US: अमेरिकेत वादात डोक्याला दुखापत झाल्याने भारतीय वंशाच्या व्यक्तीचा मृत्यू, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसली तरी जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित कैद झाला आहे.
Indian-Origin Man Killed in US: युनायटेड स्टेट्समधील 41 वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीचा (Indian-Origin Man) मारामारीदरम्यान डोक्याला दुखापत झाल्यामुळे मृत्यू (Death) झाला. पोलिसांच्या अहवालानुसार, ही घटना 2 फेब्रुवारी रोजी पहाटे 2 वाजता (यूएस स्थानिक वेळेनुसार) वॉशिंग्टन शहरातील एका रेस्टॉरंटच्या बाहेर घडली. या वर्षात यूएसमध्ये भारतीय अमेरिकन व्यक्तीच्या हत्येची ही पाचवी घटना आहे. विवेक चंदर तनेजा, असे या व्यक्तीचे नाव असून तो व्हर्जिनियामध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. (हेही वाचा, Indian Student Found Dead In Ohio: ओहायोमध्ये आढळला भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह,चौकशी सुरु; आठवड्याभरातून तिसरी घटना)
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात असे आढळून आले की, तनेजा आणि एका अज्ञात व्यक्तीमध्ये काही मुद्द्यावरून वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यानंतर त्या व्यक्तीने तनेजाला जमिनीवर फेकले आणि त्याचे डोके फूटपाथवर आदळले. बुधवारी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. (हेही वाचा -Indian-Origin Student Found Dead: भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, यूएसमधील जंगलात सापडला मृतदेह; वर्षभरातील चौथी घटना)
तनेजाचा मृत्यू हा 'हत्या' मानण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसली तरी जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित कैद झाला आहे. नंतर, मेट्रोपॉलिटन पोलिस विभागाच्या होमिसाईड ब्रँचने संशयिताची ओळख पटवण्यासाठी आणि शोधण्यासाठी लोकांची मदत मागितली.(हेही वाचा, Indian Student Found Dead In US: बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठ कॅम्पसमध्ये आढळला: रिपोर्ट)
पोलिसांनी सांगितले की, कोलंबिया जिल्ह्यात झालेल्या प्रत्येक हत्येसाठी जबाबदार व्यक्तीची माहिती देणाऱ्याला 25,000 डॉलरचे बक्षीस देण्यात येईल. या प्रकरणाची माहिती असलेल्या कोणासही 202 वर संपर्क साधण्यास सांगण्यात आलं आहे. पोलिसांना -727-9099 वर कॉल करा, असं आवाहनही करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त, निनावी माहिती 50411 वर मजकूर संदेश पाठवून विभागाच्या मजकूर टीप लाइनवर सबमिट केली जाऊ शकते, असे पोलीस विभागाने सांगितले आहे.