Coronavirus Outbreak: जगात 7 लाख 54 हजार 948 कोरोना प्रकरणे, तर 36 हजार 571 जणांचा कोरोनामुळे बळी; जागतिक आरोग्य संघटनेची माहिती

जगातील सर्वच देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. जगात आतापर्यंत 7 लाख 54948 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 36 हजार 571 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) माहिती दिली आहे.

Coronavirus Outbreak (Photo Credits: AFP)

Coronavirus Outbreak: चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जागतिक पातळीवर रोद्र रुप धारण केलं आहे. जगातील सर्वच देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. जगात आतापर्यंत 7 लाख 54948 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 36 हजार 571 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) माहिती दिली आहे.

जगभरात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. अमेरिकासारख्या विकसित देशात मंगळवारी कोरोनामुळे 865 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत अमेरिका तिसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत अमेरिकेत 1 लाख 87 हजार 347 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. (हेही वाचा - Coronavirus: तुमच्या जिल्ह्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या किती? महाराष्ट्रात सद्यास्थिती काय? घ्या जाणून)

कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणुने भारतालाही विळखा घातला आहे. देशभरात करोनाग्रस्तांची संख्या 1600 हून अधिक झाली आहे. तर आतापर्यंत 50 पेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय देशात महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक झाली आहे. आतापर्यंत राज्यात 300 पेक्षा जास्त जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.