Coronavirus: तुमच्या जिल्ह्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या किती? महाराष्ट्रात सद्यास्थिती काय? घ्या जाणून
Coronavirus Status of Maharashtr | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

COVID-19 Pandemic Status In Maharashtra: कोरोना व्हायरस (Coronavirus) आपला प्रादुर्भाव वाढवत आहे. संपूर्ण देशातील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या पाहता इतर राज्यांच्या तुलनेत ती महाराष्ट्रात अधिक आहे. असे असले तरी सोशल मीडिया आणि अफवांच्या माध्यमातून ही संख्या काहीही सांगितली जात आहे. लेटेस्टली मराठीने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची जिल्हानिहाय संख्या तपासली. ही अचूक आणि अधिकृत संख्या आम्ही येथे देत आहोत. जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या किती? राज्यातील स्थिती काय?

पाहा कोणत्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या किती?

कोविड-19 महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती 

(आकडेवारी 31 मार्च सायंकाळी 6 पर्यंतची)

.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई 151 7
2 पुणे ( शहर ग्रामीण भाग )  48 1
3 सांगली 25 0
4 मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा 36 1
5 नागपूर 16 0
6 अहमदनगर 8 0
7 यवतमाळ 4 0
8 बुलढाणा 3 1
9 सातारा 2 0
10 कोल्हापूर 2 0
11 औरंगाबाद 1 0
12 रत्नागिरी 1 0
13 सिंधुदुर्ग 1 0
14 गोंदिया 1 0
15 जळगाव 1 0
16 नाशिक 1 0
17 इतर राज्य:- गुजरात 1 0
  एकूण 302 10

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार खंबीर आहे. आपण फक्त सहकार्य करा. गर्दी टाळा. आरोग्य, पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेवर अधिक भार टाकू नका, असे अवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला वारंवार केले आहे. आजच्या पत्रकार परिषदेतही उद्धव ठाकरे यांनी जनतेला हेच आव्हान केले आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, नागरिकांनी जिवनावश्यक वस्तूंसाठी गर्दी करु नये. राज्याकडे आवश्यक तितक्या प्रमाणात अन्नधान्याचा साठा आहे. (हेही वाचा, Coronavirus: कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याची वेतन कपात केली जाणार नाही: उद्धव ठाकरे)

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालय सचिव लव अगरवाल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या 24 तासात तब्बल 227 रुग्ण कोरोना व्हायरस बाधित आढळले आहेत. त्यामुळे भारतातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्या आता 1251 इतकी झाली आहे. त्यातील 102 रुग्ण हे उपचारानंतर बरेही झाले आहेत.

आयसीएमआरने म्हटले आहे की, भारतात आतापर्यंत सीओव्हीआयडी-19 म्हणजेच कोरोना व्हायरस नमुन्यांच्या 42,788 चाचण्या झाल्या आहेत. त्यातील 4346 नमुन्यांची चाचणी सोमवारी झाली. हा आकडा आयसीएमआरच्या क्षमतेच्या 36 टक्के बरोबरीत आहे. सोबत असेही सांगण्यात आले की, संबध देशात एकूण 123 लॅब कार्यरत आहेत. 49 खासगी लॅबनाही कोरोना व्हायरस चाचणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सोमवारी देशातील खासगी लॅबमध्ये 399 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.