धक्कादायक! आईच्या एका चुकीमुळे तब्बल 17 मुलांना कोरोना व्हायरसची लागण; 12 कर्मचाऱ्यांनी केली घराची सफाई

सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या वेळी, जगभरातील बर्‍याच तज्ञांकडून एक गोष्ट वारंवार सांगितली जात आहे, ती म्हणजे कोरोनाला पराभूत करायचे असेल तर सामाजिक अंतर (Social Distancing) जरूर पाळा

Coronavirus Outbreak | Representational Image| (Photo Credits: IANS)

सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या वेळी, जगभरातील बर्‍याच तज्ञांकडून एक गोष्ट वारंवार सांगितली जात आहे, ती म्हणजे कोरोनाला पराभूत करायचे असेल तर सामाजिक अंतर (Social Distancing) जरूर पाळा. परंतु या विषाणूने आता जवळावळ संपूर्ण जगाचा ताबा घेतल्यानंतरही लोक ही गोष्ट समजू शकले नाहीत. आपणास घरात आणि बाहेरही एकमेकांपासून अंतर राखणे किती महत्वाचे आहे हे पुढील घटनेवरून लक्षात येईल. कुटुंबात सामाजिक अंतर न ठेवण्याचा अत्यंत भयावह असा परिणाम समोर आला आहे, ज्यामुळे एका आईमुळे आपल्या 17 मुलांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

एका वृत्तानुसार, या आईला भयानक अशा कोरोना विषाणूची लागण झाली होती परंतु तिला कोणतीही लक्षणे दिसू शकली नाहीत. याउपर तिने सामाजिक अंतरही ठेवले नाही परिणामी तिच्या संपूर्ण कुटूंबाला त्याचा फटका बसला. या आईने चुकून आपल्या 18 पैकी 17 मुलांना कोरोना व्हायरस संक्रमित केले. साधारण पाच आठवड्यांपूर्वी ही गोष्ट घडली.

द सनच्या वृत्तानुसार, ही घटना अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील पेनफिल्डची (Penfield) आहे, जिथे ब्रिटनी जेनिकने (Brittany Jencik) सुमारे 5 आठवड्यांपूर्वी आपल्या 17 मुलांना या विषाणूने संक्रमित केले. जेव्हा या महिलेच्या मुलापैकी एक गंभीररित्या आजारी पडला आणि त्याला कोरोनाची लक्षणे दिसायला लागली तेव्हा ही गोष्ट उघडकीस आली. या प्रकारामुळे ब्रिटनीदेखील घाबरून गेली आहे. ती म्हणते, 'काही कळायच्या आधी माझ्यामुळे मुलांना या विषाणूचा संसर्ग झाला होता. मी माझ्या आयुष्यात इतकी भीती यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती.' मात्र या महिलेला या विषाणूची लागण कशी झाली याबाबत तिला काहीच माहिती नाही. (हेही वाचा: Coronavirus: चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी येथे इंटर्नकडून चुकून लीक झाला कोरोना व्हायरस- Report)

त्यानंतर अनेक दिवस स्वतःला वेगळे ठेवल्यावर आता या महिलेची प्रकृती सुधारत आहे. या महिलेच्या घराचीही स्वच्छता केली गेली आहे त्यासाठी तब्बल 12 सफाई कामगारांची मदत घ्यावी लागली. महिलेच्या मुलांना सतत देखरेखीखाली ठेवले जात आहे आणि आता त्यांची प्रकृतीही सुधारत आहे.