YouTube Videos Removed: यूट्यूबने भारतात तीन महिन्यांत हटवले तब्बल 22.5 लाख व्हिडिओ, दोन कोटी चॅनल्स बॅन
यूट्यूबने भारतीय (Youtube India) युट्यूबसवर (Youtubers) मोठी कारवाई केली आहे. आपल्या कम्युनिटी गाईडलाईन्सचे (Community Guidelines) पालन न केल्यामुळे यूट्यूबने भारतावर मोठी कारवाई केली आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या काळात यूट्यूबने 22.5 लाख व्हिडिओ हटवले (Videos Removed) आहेत. 30 देशांमध्ये सर्वात मोठी कारवाई भारतावर केल्याचं एका अहवालात स्पष्ट झालं आहे. मंगळवारी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी यूट्यूबकडून समारे दोन कोटीहून अधिक चॅनेल देखील बॅन करण्यात आले आहे. यूट्यूबने 2023 च्या शेवटच्या तिमाहीमध्ये ही कारवाई केली. (हेही वाचा - Instagram Down? इन्स्टाग्राम डाऊन? वापरकर्त्यांचा 'X' वर दावा)
ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये सिंगापूरमधील 12.43 लाख व्हिडिओ, तर अमेरिकेतील 7.88 लाख व्हिडिओ डिलीट करण्यात आले होते. या यादीमध्ये शेवटच्या स्थानावर इराक हा देश होता. इराकमधील कारवाईत 41,176 व्हिडिओ हटवण्यात आले होते. याच कालावधीमध्ये यूट्यूबने जगभरातील 90 लाख व्हिडिओ हटवले. यामधील 53.46 टक्के व्हिडिओंना एकही व्ह्यू मिळाला नव्हता. तसंच यातील 27.07 टक्के व्हिडिओंना एक ते दहा व्ह्यूज मिळाले होते. यासोबतच यूट्यूबने स्पॅम कंटेंट शेअर करणारे सुमारे दोन कोटी चॅनल्सही काढून टाकले.
पाहा पोस्ट -
यूट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्स या जगभराल लागू केल्या जातात. यांचं पालन न केल्यास व्हिडिओंवर आणि प्रसंगी चॅनल्सवर कारवाई केली जाते. अपलोड करणारी व्यक्ती कोण आहे, कोणत्या देशाची आहे हे यावेळी पाहिलं जात नाही असं स्पष्टीकरण कंपनीने दिलं आहे.