Xiaomi च्या Mi 10i स्मार्टफोनची भारतात जबरदस्त विक्री; पहिल्या सेलमध्ये विकले 200 कोटी रुपयांचे स्मार्टफोन
अॅमेझॉन इंडिया आणि Mi.com वर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला होता. याव्यतिरिक्त, हा फोन देशभरातील 10,000 रिटेल पार्टनर प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध होता.
चीनी स्मार्टफोन उत्पादक शाओमी कंपनीची नवीन वर्षात अजूनही भरभराट होत आहे. 2021 च्या सुरूवातीस, शाओमीने 108 एमपी स्मार्टफोन Mi 10i लाँच केला. शाओमी Mi 10i स्मार्टफोन 8 जानेवारी रोजी प्रथम विक्रीसाठी उपलब्ध झाला होता. तसेच, अॅमेझॉन प्राइम सदस्यासाठी Mi 10i स्मार्टफोन 7 जानेवारी 2021 रोजी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. Mi 10i स्मार्टफोनच्या पहिल्या सेलमध्ये 200 कोटी रुपयांचे फोन विकण्यात आले आहेत. अॅमेझॉन इंडिया आणि Mi.com वर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला होता. याव्यतिरिक्त, हा फोन देशभरातील 10,000 रिटेल पार्टनर प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध होता. हा फोन पॅसिफिक सनराईज, अटलांटिक ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये येतो. फोनमध्ये 108 एमपी कॅमेरा आहे. (Mi 11 Lite स्मार्टफोन लवकरचं भारतात लाँच होणार; जाणून घ्या संभाव्य किंमत आणि खास फिचर्स)
ऑफर्स -
Mi 10i स्मार्टफोनचा 6 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 20,999 रुपयांमध्ये येतो. हाच 6 जीबी 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 21,999 रुपयांमध्ये खरेदी करता येतो. तर 8 जीबी 128 जीबी व्हेरिएंट 23,999 रुपयांना मिळतो. (Vivo Y51 स्मार्टफोन भारतात लॉन्च, झिरो डाउन पेमेंट स्किम आणि 1 हजार रुपयांच्या कॅशबॅकवर घरी घेऊन जाता येणार)
Mi 10i स्पेसिफिकेशन -
Mi 10i स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. ज्याचा रिझोल्यूशन 1,080x2,400 पिक्सल आहे. तसेच स्क्रीन संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे. याशिवाय डिव्हाइसमध्ये स्नॅपड्रॅगन 750 जी प्रोसेसर उपलब्ध आहे. त्याच वेळी, हा हँडसेट एमआययूआय 12 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. कॅमेर्याबद्दल सांगायचे झाले तर शाओमीने एमआय 10 आय स्मार्टफोनमध्ये राउंड शेप क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात प्रथम 108 एमपी सॅमसंग एचएम 2 सेन्सर आहे, दुसरा 8 एमपी अल्ट्रा वाईड एंगल लेन्सचा आहे, तिसरा 2 एमपी मॅक्रो लेन्सचा आहे. तसेच चौथा 2 एमपी खोलीचा सेन्सर आहे.
याशिवाय फोनच्या फ्रंटमध्ये 16 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे, जो नाईट मोड 1.0, एआय पोर्ट्रेट मोड आणि एआय ब्यूटीफिकेशन सारख्या वैशिष्ट्यांना समर्थन देतो. Mi 10i स्मार्टफोनमध्ये 4,820mAh बॅटरी आहे, जी 33 डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची बॅटरी 30 मिनिटांत 68 टक्क्यांपर्यंत चार्ज होते, असा कंपनीचा दावा आहे. त्याच वेळी, Mi 10i स्मार्टफोनची बॅटरी पूर्ण चार्ज करण्यासाठी 58 मिनिटे लागतात. याशिवाय हँडसेटमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5 जी, यूएसबी टाइप-सी पोर्ट, वाय-फाय, 3.5mm मिमी ऑडिओ जॅक आणि ब्लूटूथ सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.