WhatsApp वर चुकूनही 'हे' काम करु नका, नाहीतर कोर्टात वारंवार जावे लागेल

त्यामुळे आता फेसबुकने व्हॉट्सअॅपचा चुकीच्या मार्गाने वापर केल्यास त्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

WhatsApp (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअॅपचे (WhatsApp) अधिकार फेसबुक (Facebook) कंपनीकडे आहे. त्यामुळे आता फेसबुकने व्हॉट्सअॅपचा चुकीच्या मार्गाने वापर केल्यास त्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तर जास्तकरुन ऑटोमेटेड बल्क पद्धतीने मेसेज पाठवणाऱ्यांमध्ये व्हॉट्सअॅपचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यास त्याच्या विरोधात कडक कारवाई होणार आहे. त्यामुळे तुम्हाला वारंवार कोर्टात खेपा घालाव्या लागतील.

परंतु अद्याप फेसबुकने कोणत्या पद्धतीची कारवाई करणार याबद्दल स्पष्ट केलेले नाही. तर व्हॉट्सअॅपने असे सांगितले आहे की, त्यांचे हे अॅप बल्क मेसेज किंवा ऑटोमेटेड मेसेज पाठवण्यासाठी नाही. याबद्दल व्हॉट्सअॅपचे हे विधान एका रिपोर्टद्वारे समोर आले आहे. देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक व्हॉट्सअॅपचा वापर क्लोन अॅपच्या माध्यमातून करण्यात आला होता.

(मार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे)

फ्री क्लोन अॅपच्या सहाय्याने व्हॉट्सअॅप युजर्सला बल्क मेसेज पाठवण्याची सुविधा मिळते. मात्र व्हॉट्सअॅपने आता एका वेळी पाच जणांनाच मेसेज किंवा फोटो पाठण्याची परवानगी दिली आहे. त्याचसोबत गेल्या वर्षात भारतात व्हॉट्सअॅपवरील व्हायरल झालेल्या चुकीच्या गोष्टींमुळे मॉब लिचिंगच्या घटना घडल्याचे दिसून आल्या आहेत.