WhatsApp मुळे स्मार्टफोनमधील स्टोरेज अधिक व्यापला जातोय? युजर्ससाठी लॉन्च होणार एक नवे टूल
याच कारणास्तव आता कंपनी युजर्सची ही तक्रार दूर करण्यासाठी एक नव टूल लवकरच लॉन्च करणार आहे.
जगभरात मेसेजिंगसाठी प्रसिद्ध असणारे अॅप WhatsApp त्यांच्या युजर्ससाठी प्रत्येक वेळी नवे फिचर्स किंवा वर्जन रोलआउट करतात. जेणेकरुन एकमेकांशी चॅटिंग करताना संभाषण अधिक मजेशीर व्हावे. परंतु व्हॉट्सअॅपमुळे स्मार्टफोनमधील अधिक स्पेस सुद्धा व्यापला जातो. याच कारणास्तव आता कंपनी युजर्सची ही तक्रार दूर करण्यासाठी एक नव टूल लवकरच लॉन्च करणार आहे. व्हॉट्सअॅप त्यांच्या iOS आणि Android अॅप बीटा वर्जन मध्ये काही नवे फिचर्सची चाचणी करत आहे. त्यामध्ये काही लहान-मोठे बदल पहायला मिळाले आहेत. स्टोरेज संबंधित अॅपमध्ये एक नवे टूल टेस्टिंग नंतर लॉन्च करण्यात येण्याची शक्यता आहे.
व्हॉट्सअॅपमध्ये होणारे बदल आणि अपडेट्सवर लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo यांच्या मते, Storage Usage टूल अद्याप डेव्हलप केले जात आहे. मात्र युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही. हे फिचर रोलआउट करण्यापूर्वी त्याची टेस्टिंग केली जात आहे. यासदंर्भातील अधिकृत लॉन्चिंगची तारीख सुद्धा समोर आलेली नाही. परंतु स्टोरेज संबंधित या टूल बाबत रिपोर्ट व्हॉट्सअॅपच्या अॅन्ड्रॉईड वर्जन येथए दाखवण्यात येत आहे. मात्र iOSमध्ये अद्याप या फिचर बाबत रिपोर्ट दाखवला जात नाही आहे.(Whatsapp Tricks: कोणाचाही Whatsapp Status Seen न केल्याशिवाय कसा पाहावा, जाणून घ्या 'ही' सोप्पी ट्रिक)
WhatsApp अॅन्ड्रॉइड आणि आयओएस दोन्ही मध्ये एकसारखे फिचर्स दाखवले जातात. सुरुवातीला अॅन्ड्रॉइड युजर्सला मिळाल्यानंतर आयओएसच्या युजर्ससाठी सुद्धा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. व्हॉट्सअॅपकडून अॅन्ड्रॉइडच्या वर्जनमध्ये काही टूल्सची टेस्टिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे युजर्सला त्याच्या आधारे त्यांचे चॅट्स आणि मेसेज डिटेल्स मॅनेज करता येणार आहेत. WhatsApp Storage Usage पूर्णपणे नव्याने डिझाइन करण्यात येत आहे. त्याचसोबत युजर्सला तारखेनुसार मेसेज सुद्धा सर्च करण्याचा ऑप्शन मिळू शकतो.
युजर्सला एखादा मेसेज सहजरित्या मिळण्यासाठी व्हॉट्सअॅप काही डिफॉल्ट फिल्टर्स आणू शकतात. उदाहरणार्थ युजर्सला एकदाच फॉरवर्डेड फाइल्स पाहता येणार आहेत. तसेच Size च्या आधारावर मोठ्या फाइल्स सुद्धा फिल्टर करता येणार आहेत. यासाठी युजर्सला एक नवे Sort बटण दिले जाणार असून त्यांना कोणत्या आधारावर मेसेज फिल्टरर्स करायचे आहेत त्याची संधी मिळणार आहे. यामध्ये Newest,Oldest आणि By Size हे तीन ऑप्शन दिले जाणार आहेत. या फिचर्स बाबत सुद्धा अद्याप टेस्टिंग करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.