खुशखबर! Whatsapp वापरण्यासाठी आता फोनची नाही लागणार गरज, लवकरच येणार Desktop Version

हे प्रयत्न यशस्वी झाल्यास यापुढे युजर्सना व्हाट्सऍप वापरण्यासाठी मोबाईलची सुद्धा गरज उरणार नाही.

WhatsApp (Photo Credits: Pixabay)

फेसबुक (Facebook) च्या मालकी अंतर्गत येणाऱ्या व्हाट्सऍप (Whatsapp) या प्रसिद्ध चॅटिंग ऍपचे डेस्कटॉप व्हर्जन (Desktop Version)  सुरु करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरु आहेत. हे प्रयत्न यशस्वी झाल्यास यापुढे युजर्सना व्हाट्सऍप वापरण्यासाठी मोबाईलची सुद्धा गरज उरणार नाही.खरतर यापूर्वी सुद्धा आपल्याला व्हाट्सऍप डेस्कटॉपवर वापरण्यासाठी व्हाट्सऍप वेब (Whatsapp Web) हा पर्याय वापरता येत होता मात्र त्यासाठी मोबाइलमध्ये इंटरनेट असणे गरजेचे होते, मात्र मात्र या नव्या प्रणालीमुळे मोबाईल नेटचा वापर न करताही तुम्ही हे अप्लिकेशन वापरू शकणार आहात. Whatsapp ने युजर्ससाठी आणली 'ही' पाच नवी फीचर्स, आता चॅटिंग होणार आणखीन सोयीस्कर

यासंदर्भात, WABetaInfo या विश्वसनीय व्हाट्सऍप लीकर अकाउंट च्या ट्विटमधून माहिती देण्यात आली, ज्यानुसार एक युनिव्हर्सल विंडोज प्लॅटफॉर्म तयार करण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे . तसेच सोबतच एक नवी मल्टी प्लॅटफॉर्म सिस्टिम तयार करण्याचा सुद्धा प्लॅन आहे ज्यामुळे तुमचा फोन बंद झाल्यास सुद्धा तुम्ही व्हाट्सऍप वापरू शकता किंवा एकाच वेळी अनेक डिव्हाइसेस मधून व्हाट्सऍप वापरता येईल.

दरम्यान यंदा वर्षाच्या सुरावतीपासूनच व्हाट्सऍप आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन सुविधा आणण्याच्या प्रयत्नात आहे. व्हाट्सऍप पे च्या माध्यमातून पैसे पाठवणे, बिल भरणे, रिचार्ज करणे आणि सोबतच चॅटही करणं असं सगळं एकाच अॅपमध्ये आल्यावर यूजर्सना वेगवेगळ्या ऍपची गरज उरणार नाही अशी तरतूद करण्यात आली होती.