WhatsApp लवकरच घेऊन येणार शानदार फिचर, एकाचवेळी 4 स्मार्टफोन करता येणार Access
त्यामुळे युजर्सला चॅटिंग करताना अधिक मजा येण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून हा प्रयत्न करण्यात येतो. गेल्या काही दिवसांपूर्वी अॅन्ड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी अॅनिमेटेड स्टिकर्स उपलब्ध करुन दिले आहेत.
जगप्रसिद्ध शॉर्ट मेसेजिंग अॅप WhatsApp त्यांच्या युजर्सला खुश करण्यासाठी नेहमीच बदलत्या ट्रेन्ड नुसार फिचर्स घेऊन येतात. त्यामुळे युजर्सला चॅटिंग करताना अधिक मजा येण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून हा प्रयत्न करण्यात येतो. गेल्या काही दिवसांपूर्वी अॅन्ड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी अॅनिमेटेड स्टिकर्स उपलब्ध करुन दिले आहेत. त्यानंतर आता लवकरच व्हॉट्सअॅपकडून असे एक शानदार फिचर आणणार आहे ज्यामुळे युजर्सला एकाचवेळी 4 स्मार्टफोन अॅक्सेस करता येणार आहे. हे फिचर व्हॉट्सअॅप वेब पेक्षा वेगळे असणार आहे. एका रिपोर्ट्सनुसार, कंपनीने या फिचरवर काम करण्यास सुरुवात केली असून लवकरच युजर्ससाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
WABetaInfo यांच्या रिपोर्टनुसार, WhatsApp साठी v2.20.196.8 बीटा वर्जन रोलआउट केले जाणार आहे. या वर्जनमध्ये युजर्स मल्टीपल डिवाइसेस मध्ये एकत्रितपणे WhatsApp चे अकाउंट अॅक्सेस करु शकणार आहे. याच्यासोबत एक स्क्रिन शॉर्ट सुद्धा शेअर केला असून Linked Devices असे ऑप्शन दिले आहे. जे अपकमिंग फिचर असून युजर्सला एकाच क्रमांकावरुन एकत्रित 4 फोनचा वापर करता येणार आहे.(फेसबुक मेसेंजर चे नवे App Lock फिचर; Face आणि Touch ID ने करु शकाल अॅप अनलॉक)
Linked Devices बाबत बोलायचे झाल्यास युजर्सला यामध्ये चार विविध डिवाइसेसमध्ये एकत्रित लॉगिन करता येणार आहे. यासाठी युजर्सला त्यांच्या प्रायमरी डिवाइस मधून लॉगआउट करण्याची गरज नाही. रिपोर्टनुसार सध्या कंपनी हे फिचर आयओएस युजर्सासाठी उपलब्ध करुन देणार आहे. मात्र नंतर अॅन्ड्रॉइडसाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. खरंतर व्हॉट्सअॅफ मल्टीपल डिवाइसेससाठी WhatsApp Web फिचर्स उपलब्ध आहे. या फिचरचा वापर करुन युजर्सला स्मार्टफोन डेस्कटॉपला कनेक्ट करुन वापरता येणार आहे.