WhatsApp Diwali Stickers Pack: दिवाळी निमित्त व्हॉट्सअॅपने लॉन्च केले खास स्टिकर्स; कसे कराल डाऊनलोड? जाणून घ्या

अवघ्या काही तासांत दिवाळीची पहिली पहाट होईल आणि सोशल मीडियावर चहुबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होईल. अशा वेळी व्हॉट्सअॅप हे नवे अॅनिमेटेड स्टिकर्स नक्कीच फायदेशीर ठरतील.

WhatsApp (Photo Credits: Pixabay)

फेसबुकची (Facebook) मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने (WhatsApp) दिवाळी (Diwali) निमित्त खास स्टिकर्स (Stickers) ल़ॉन्च केले आहेत. अवघ्या काही तासांत दिवाळीची पहिली पहाट होईल आणि सोशल मीडियावर चहुबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होईल. अशा वेळी व्हॉट्सअॅप हे नवे अॅनिमेटेड स्टिकर्स नक्कीच फायदेशीर ठरतील. सध्याच्या डिजिटल युगात सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअॅप अगदी सर्रास वापरले जाते. तसंच कोविड-19 संकटाच्य काळात सर्वच नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या भेटी होतीलच असे नाही. त्यामुळे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी हा व्हॉट्सअॅप स्टिकर्स पॅक अगदी सुयोग्य आहे. व्हॉट्सअॅपचे हे 'Happy Diwali' अॅनिमेडेट स्टिकर्स कसे डाऊनलोड कराल आणि पाठवाल? जाणून घेऊया...

WhatsApp Happy Diwali Stickers Pack (Photo Credits: WhatsApp)

# सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल असणे आवश्यक आहे.

# व्हॉट्सअॅप ओपन करा आणि ज्या व्यक्तीला तुम्हाला दिवाळी स्टिकर्स पाठवायचा आहे त्याचा चॅट बॉक्स ओपन करा.

# GIF आयकॉनसोबत असलेल्या 'Stickers' वर क्लिक करा. iOS युजर्ससाठी टेक्स्टबारच्या उजव्या बाजूला 'Stickers' सेक्शन असेल.

# त्यानंतर  '+' आयकॉनवर क्लिक करा. नंतर 'Happy Diwali' stickers pack सिलेक्ट करुन डाऊनलोड करा. (हे ही वाचा: WhatsApp Pay Cashback Offer: केवळ 1 रुपया ट्रान्सफर करुन मिळवा 51 रुपयांचा कॅशबॅक)

# स्टिकर्स डाऊनलोक केल्यानंतर तो पॅक तुमच्या व्हॉट्सअॅपमध्ये अॅड होईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचे स्टिकर सिलेक्ट करुन नातेवाईक, मित्रमंडळींना पाठवू शकता.

दरम्यान, काही युजर्संना व्हॉट्सअपवर Happy Diwali Stickers Pack दिसणार नाही. अशावेळी त्यांना हा स्टिकर पॅक डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरील थर्ड पार्टी अॅप्सची मदत घ्यावी लागेल किंवा नवा स्टिकर पॅक तुमच्या व्हॉट्सअॅप सेक्शनमध्ये येण्याची वाट पाहावी लागेल.