WhatsApp वर लवकरच जाहिराती दाखवल्या जाणार
परंतु आता लवकरच व्हॉट्सअॅपवर जाहिराती दाखवल्या जाणार आहेत.
सोशल मीडियात सध्या प्रसिद्ध असणारे व्हॉट्सअॅप प्रत्येक वेळी आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर्स घेऊन येत असते. परंतु आता लवकरच व्हॉट्सअॅपवर जाहिराती दाखवल्या जाणार आहेत. तर 2020 पर्यंत जाहिराती युजर्सला व्हॉट्सअॅपवर पाहता येणार आहेत. मात्र व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करताना कोणताही अडथळा येणार नसल्याचे सांगितले जात आहे.
काही वर्षांपूर्वी फेसबुकने व्हॉट्सअॅपची कंपनी विकत घेतली होती. त्यानंतर व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार का असे प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु आता व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी पैसे मोजावे लागत नसून जाहीराती मात्र पाहायला मिळणार आहेत.
मात्र चॅटिंग करताना जाहिरातींचा अडथळा येणार नसला तरीही व्हॉट्सअॅपवरील स्टेटस पाहताना जाहिराती पाहाव्या लागू शकणार आहेत. तसेच सध्या स्टेटसमध्ये टेक्स, फोटो किंवा व्हिडिओसुद्धा शेअर करता येतो.