WhatsApp Feature Update: भारतातील युजर्ससाठी व्हॉट्सॲपचे नवे फीचर, आता चॅटींग करतानाही ऐकता येणार 'वॉयस मेसेज'

हे व्हॉट्सॲप आता नवे फिचर (WhatsApp New Feature) घेऊन आले आहे. वॉट्सॅपने नुकतेच हे फिचर रोलआऊट केले. ज्यामध्ये आता युजर्सला चॅटींगसोबतच वॉईस मेसेजही ऐकता येणार आहेत.

WhatsApp | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

स्मार्टफोन आणि इंटरनेट विश्वातील इंस्टंट मेसेजिंग मोबाइल एप्लिकेशन बात विचारले तर कोणीही व्हॉट्सॲपचेच (WhatsApp ) नाव घेईल. हे व्हॉट्सॲप आता नवे फिचर (WhatsApp New Feature) घेऊन आले आहे. वॉट्सॅपने नुकतेच हे फिचर रोलआऊट केले. ज्यामध्ये आता युजर्सला चॅटींगसोबतच वॉईस मेसेजही ऐकता येणार आहेत. त्यामुळे युजर्सला एकाच वेळी व्हॉट्सॲप मेसेज वाचताना ते ऐकण्याचीही मजा घेता येणार आहे. दरम्यान, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सएपने यापूर्वी घोषणा केली होती की ते नवीन फीचर्स आणणार आहेत. ज्यामुळे प्लॅटफॉर्मवर व्हॉइस मेसेजिंग अनुभव आणखी सुधारतील. त्यामुळे व्हॉट्सॲपनेआता अधिकृतपणे नवीन वैशिष्ट्यांसह नवीन व्हॉइस मेसेजिंग अनुभव भारतातील युजर्ससाठी आणला आहे.

काय आहेत नवे फीचर?

व्हॉट्सॲप युजर्सला ही संधी देते की, चॅटबॉक्सच्या बाहेर जानही अधिक व्यापक म्हणजे मल्टीटाक्स करता येऊ शकते. जेणेकरुन हे संदे वाचता आणि ऐकता येतील. समोरच्याला प्रतिसाद देता येईल.

रेकॉर्डिंग थांबवा/पुन्हा सुरू करा: व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करताना, तुम्ही आता रेकॉर्डिंगला विराम देऊ शकता. तसेच, हे रेकॉर्डींग पूर्ण झाल्यावर ऐकू शकता. तुम्हाला रेकॉर्डींग थांबवायचे, बंद करायचे असेल तर तुम्हे तसेही करु शकतात. (हेही वाचा, WhatsApp वरील जुने आणि डिलीट झालेले मेसेज पुन्हा कसे मिळवाल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स)

वेव्हफॉर्म व्हिज्युअलायझेशन: रेकॉर्डिंगचे अनुसरण करण्यात मदत करण्यासाठी व्हॉइस संदेशावरील ध्वनीचे दृश्याची प्रातिनिधीकता दर्शवते.

आगोदर ऐका पुन्हा वाचा: तुमचे व्हॉइस संदेश पाठवण्यापूर्वी ते ऐका.

प्लेबॅक लक्षात ठेवा: व्हॉइस मेसेज ऐकताना तुम्ही थांबल्यास, तुम्ही चॅटवर परत आल्यावर तुम्ही जिथे सोडले होते तेथून सुरू करू शकता.

फॉरवर्डेड मेसेजेसवर जलद प्लेबॅक: नियमित आणि फॉरवर्डेड मेसेज दोन्हीवर वेगवान संदेश ऐकण्यासाठी 1.5x किंवा 2x वेगाने व्हॉइस मेसेज प्ले करा.

दरम्यान, व्हॉट्सॲपने पुन्हा एकदा नवी फीचर्स आणल्यामुळे युजर्सला आणखी सेवा मळणार आहेत. व्हॉट्सॲप हे अलिकडील काळातील सर्वात लोकप्रिय ॲप म्हणून ओळखले जाते.