Ashok Thamarakshan Builds Own Plane: यूके स्थित भारतीय अभियंत्याने बनवले विमान, कुटुंबासह करतो जगभर प्रवास

अशोक थामरक्षन (Ashok Thamarakshan) असे या अभियंत्याचे नाव आहे. कोरोना काळात लॉकडाऊन (Lockdown ) लागल्याने मिळालेल्या प्रदीर्घ वेळेचा त्याने कल्पक वापर केला. त्याने चक्क स्वत:च्या बनावटीचे विमान तयार केले आहे.

Ashok Thamarakshan |(Photo Credit - ANI)

युकेमध्ये सध्या राहात असलेल्या परंतू, मूळच्या केरळ (Kerala) राज्यातील एका मेकॅनिकल अभियंत्याने (Mechanical Engineer) चक्क एक विमान बनवले आहे. अशोक थामरक्षन (Ashok Thamarakshan) असे या अभियंत्याचे नाव आहे. कोरोना काळात लॉकडाऊन (Lockdown ) लागल्याने मिळालेल्या प्रदीर्घ वेळेचा त्याने कल्पक वापर केला. त्याने चक्क स्वत:च्या बनावटीचे विमान तयार केले आहे. विशेष म्हणजे या विमानाने उड्डाण करत त्याने आपल्या कुटुंबासोबत देशोदेशी भ्रमंतीही केली आहे. त्यांनी यापूर्वी ब्रिटिश नागरी विमान वाहतूक कंपनीकडून पायलटचा परवाना मिळवला होता.

आपलया नाविन्यापूर्ण कामगिरीबाबत बोलताना अशोक थामरक्षन एएनआयशी बोलताना म्हणाले ते केरळच्या अलापुझा जिल्ह्यातील मेकॅनिकल अभियंता आहेत. त्यांनी यापूर्वी ब्रिटिश नागरी विमान वाहतूक कंपनीकडून पायलटचा परवाना मिळवला होता. लॉकडाऊनच्या काळात मला विमान बनवण्याची कल्पना सूचली. मी लंडनमधील माझ्या घरात एक तात्पुरती कार्यशाळा बांधली. मी मे 2019 मध्ये विमानाचे काम सुरू केले आणि ते 21 नोव्हेंबर 2021 रोजी पूर्ण केले.

G Diya | Ashok Thamarakshan | (Photo Credit - ANI)

पुढे बोलताना अशोक म्हणाले, परवान्यासाठी, तीन महिन्यांची ट्रायल फ्लाइट होती. पहिली फ्लाइट 7 फेब्रुवारी 2022 रोजी लंडनमध्ये होती. ती 20 मिनिटांची होती. 6 मे रोजी आमचा कौटुंबिक जर्मनी, फ्रान्स आणि इटलीचा दौरा सुरू झाला. ट्रॅफिक ब्लॉकमुळे आपण स्वतः विमान बनवण्याचा विचार केला. आता विमानाच्या सहाय्याने तो एका तासात 250 किमीचा प्रवास कोणत्याही ट्रॅफिक ब्लॉकशिवाय करू शकतो, असे ते सांगतात. (हेही वाचा, Yavatmal: हेलिकॉप्टर निर्माता आठवी पास शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख इब्राहिम याचा उड्डाणादरम्यान मृत्यू, यवतमाळ येथील घटना)

Ashok Thamarakshan | (Photo Credit - ANI)

मला माझ्या कुटुंबाला विमानात सफरीसाठी घेऊन जायचे होते. ते माझे स्वप्न होते. ते पूर्ण करायचे तर विमान भाड्याने घेणे हा खूप महागडा पर्याय होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सूचलेली कल्पना प्रत्यक्षात आणून मी विमान बनवले. आम्ही 4 देशांत उड्डाण केले आणि हे विमान देशभरात उड्डाण करण्यास सक्षम आहे, असेही अशोक थमाराक्षन म्हणाले.

G Diya | Ashok Thamarakshan | (Photo Credit - ANI)

हे विमान चार असणी आहे. एका वेळी यात केवळ चार व्यक्ती बसू शकतात. हे विमान बनविण्यासाठी 1,40,00 युरो खर्च आला. या विमानला त्यांनी "जी दिया" (G Diya) असे नाव दिले आहे. G लंडनमधील फ्लाइटचे प्रतीक आहे आणि 'दिया' हे त्यांच्या लहान मुलीचे नाव आहे.

G Diya | Ashok Thamarakshan | (Photo Credit - ANI)

ट्विट

अशोक यांची पत्नी अभिलाषा मूळची इंदूरची असून लंडनमध्ये विमा क्षेत्रात काम करते. हे कुटुंब ३० जुलै रोजी लंडनला परतणार आहे. अशोक थामरक्षन बिलेरिके हे एसेक्स, यूके येथे राहतात.