Twitter ला डिजिटल मीडिया संबंधित नवे IT नियमांचे पालन करावे लागणार- दिल्ली हायकोर्ट
या टिप्पणीसह न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी अधिवक्ता अमित आचार्य यांच्या याचिकेवर केंद्र आणि सोशल मीडिया मंच ट्विटरला नोटीस जाहीर केली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी असे म्हटले आहे की, जर डिजिटल मीडिया संबंधित नव्या आयटी नियमांवर बंदी आणली गेली नसल्यास तर ट्विटरला त्याचे पालन करावे लागणार आहे. या टिप्पणीसह न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी अधिवक्ता अमित आचार्य यांच्या याचिकेवर केंद्र आणि सोशल मीडिया मंच ट्विटरला नोटीस जाहीर केली आहे. त्यानुसार त्यांना आता आपली बाजू मांडण्याचे निर्देशन दिले आहेत. आचार्य यांनी आपल्या याचिकेत दावा केला आहे की, ट्विटर कडून नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे.
दुसऱ्या बाजूला ट्विटरने कोर्टात असा दावा केला आहे की, त्यांनी नियमांचे पालन केले आहे. तसेच त्यांनी एक तक्रारींचे निवारण करणाऱ्या अधिकाऱ्याची सुद्धा नेमणूक केली आहे. परंतु केंद्र सरकारने या दाव्याला चुकीचे ठरवले आहे. कोर्टाने असे म्हटले की, जर या (नियम) वर बंदी घातली नाही तर त्यांना त्याचे पालन करावे लागणार आहे.(New Social Media Rules: सोशल मीडिया, WhatsApp यूजर्सनी घाबरु नये, आपल्या व्यक्तिगततेचा आम्हाला आदर- केंद्र सरकार)
आचार्य यांनी वकील आकाश वाजपेयी आणि मनीष कुमार यांच्या द्वारे दाखल करण्यात आलेल्या याचिकेत असे म्हटले होते की, त्यांनी जेव्हा काही ट्विट संदर्भात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना सरकारी नियमांचे कथित रुपात पालन न केल्याबद्दल कळले. सुनावणी दरम्यान, केंद्र सरकारने स्थायी वकील रिपुदमन सिंह भारद्वाज यांनी कोर्टाला म्हटले की, ट्विटरने नियमांचे पालन केलेले नाही.
याचिकेत असे ही म्हटले की, ट्विटरने तक्रार निवारण स्थानिय अधिकारी नियुक्ती करण्यासंबंधित केंद्राच्या आयटी कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे ट्विटरला नियमांचे पालन करण्याचे निर्देशन द्यावे. तसेच नवे आयटी नियम 25 फेब्रुवारी समोर आले आणि केंद्राने ट्विटरसह अन्य सोशल मीडियाला याचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला होता. तर हा कालावधी 25 मे रोजी संपला. तरीही ट्विटरने त्यासंबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी अद्याप तक्रार निवारम स्थानिक अधिकाऱ्याची नियुक्ती सुद्धा केलेली नाही.