TRAI New Rules: खुशखबर! आता मोबाईल फोन्सवर Fake Calls आणि SMS ला बसणार आळा; 1 मे पासून होणार मोठा बदल, घ्या जाणून

तर, जिओने बनावट कॉल्स आणि मेसेजसाठी एआय फिल्टर्स बसवण्याची तयारी जाहीर केली आहे. सध्या तरी फक्त याबाबत माहिती समोर आली आहे, परंतु असा अंदाज आहे की 1 मे 2023 पासून, एआय फिल्टर्सचा अनुप्रयोग भारतात सुरू होईल.

Mobile Phone Pixabay

तुम्हीही फेक कॉल्स किंवा मेसेजमुळे हैराण आहात? जर याचे उत्तर होय असे असेल तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) कडून लवकरच काही नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. येत्या 1 मे 2023 पासून, ट्राय नवीन नियमांनुसार एक फिल्टर सेट करणार आहे. याद्वारे, फोनमध्ये बनावट कॉल आणि एसएमएसवर बंदी घातली जाऊ शकते, ज्याद्वारे आपण अनोळखी कॉल आणि एसएमएसपासून मुक्त होऊ शकतो.

सर्व दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या फोन कॉल्स आणि मेसेज सेवांमध्ये अधिकृत इंटेलिजेंस स्पॅम फिल्टर जोडण्याचे आदेश ट्रायने दिले आहेत. याद्वारे फेक कॉल्स आणि मेसेज टाळता येऊ शकतात. आदेशानुसार, सर्व दूरसंचार कंपन्यांना 1 मे 2023 पूर्वी फोन कॉल्स आणि संदेशांशी संबंधित फिल्टर स्थापित करावे लागतील.

एअरटेलने या संदर्भात यापूर्वीच असे एआय (AI) फिल्टर देण्याची घोषणा केली आहे. तर, जिओने बनावट कॉल्स आणि मेसेजसाठी एआय फिल्टर्स बसवण्याची तयारी जाहीर केली आहे. सध्या तरी फक्त याबाबत माहिती समोर आली आहे, परंतु असा अंदाज आहे की 1 मे 2023 पासून, एआय फिल्टर्सचा अनुप्रयोग भारतात सुरू होईल. ट्रायच्या नव्या नियमामुळे फेक कॉल्स आणि मेसेजला आळा घालण्यास मदत होणार आहे. याअंतर्गत ट्रायने 10 अंकी फोन नंबरवर प्रमोशनल कॉल्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा: व्हॉट्सअ‍ॅपचं बहुप्रतिक्षित 'One WhatsApp Multiple Phones' फीचर लॉन्च; आता 4 डिव्हाईस मध्ये वापरा अ‍ॅप)

ट्रायने कॉलर आयडी फीचर देखील आणले आहे जे कॉलरचे नाव आणि फोटो प्रदर्शित करेल. एअरटेल आणि जिओ या संदर्भात Truecaller अॅपशीही बोलणी करत आहेत. मात्र, कंपनी प्रायव्हसी लक्षात घेऊन कॉलर आयडी फीचर लागू करण्यापासून परावृत्त करत आहे. कॉलर आयडी फीचरमुळे लोकांच्या प्रायव्हसीमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात असे बोलले जात आहे.