International Women's Day 2022: फक्त महिलांसाठी लॉन्च झाला 'हा' स्मार्टफोन; फीचर्स जाणून तुम्हीही व्हाल हैराण
Lava BeU चे स्क्रीन रिझोल्यूशन 720×1,560 पिक्सेल आहे. सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही याला चुटकीसरशी अनलॉक करू शकता.
International Women's Day 2022: 8 मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women’s Day 2022) साजरा केला जातो. या दिवसाच्या माध्यमातून महिलांना जागृत करून त्यांच्या समाजातील योगदानाला प्रोत्साहन दिले जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कोणत्याही महिलेबद्दल तुमचा आदर व्यक्त करायचा असेल तर तुम्ही तिला गिफ्ट देऊ शकता. यासाठी मेड इन इंडिया स्मार्टफोन Lava BeU हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. Lava BeU खास महिलांना लक्षात घेऊन सादर करण्यात आले आहे. या स्मार्टफोनच्या डिझाइनपासून ते फिचर्सपर्यंत सर्वच गोष्टी महिलांना नक्कीच आवडतील. Lava BeU च्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊयात...
Lava BeU फिचर्स -
Lava BeU ची किंमत 6,388 रुपये आहे आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटशिवाय जवळजवळ सर्व ई-कॉमर्स साइटवरून खरेदी केली जाऊ शकते. हा स्मार्टफोन पिंक आणि गोल्डन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. Lava BeU मध्ये महिलांच्या सुरक्षेचा विचार करून BE Safe अॅपचा वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्ही 10 आपत्कालीन संपर्क सेव्ह करू शकता. समस्या असल्यास, सूचना या संपर्कांपर्यंत पोहोचतील. त्याची रचना अतिशय आकर्षक आहे आणि त्याच्या मागील पॅनेलमध्ये तळाशी एक स्पीकर आहे. जो फुलाच्या आकारात बनविला गेला आहे. (वाचा - iPhone अवघ्या 15,499 रुपयांत खरेदी करता येणार, Flipkart देतेय संधी)
लाव्हाचा हा कमी बजेटचा स्मार्टफोन आहे. यात तुम्हाला पॉवर बॅकअपसाठी 4,060mAh बॅटरी मिळेल. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी एका चार्जवर 16 तासांचा टॉकटाइम देण्यास सक्षम आहे. याशिवाय Lava BeU मध्ये 2GB रॅमसह 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही 256GB पर्यंत डेटा वाढवू शकता.
या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य सेन्सर 13MP आहे, तर 2MP चा दुय्यम सेन्सर आहे. त्याच वेळी, व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीच्या सोयीसाठी, वापरकर्त्यांना यात 8MP फ्रंट कॅमेरा मिळेल. हा स्मार्टफोन Android 10 Go Edition वर आधारित आहे आणि octa-core SoC प्रोसेसरवर सादर करण्यात आला आहे.
दरम्यान, Lava BeU चे स्क्रीन रिझोल्यूशन 720×1,560 पिक्सेल आहे. सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही याला चुटकीसरशी अनलॉक करू शकता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)