WhatsApp ला टक्कर देण्यासाठी Telegram ने रोलआउट केले 'हे' दमदार फिचर्स
कारण टेलिग्रामने त्यांचे नवे चार दमदार फिचर्स रोलआउट केले आहे.
इंस्टंट मॅसेजिंग अॅप WhatsApp ला Telegram कडून जोरदार टक्कर दिली जात आहे. कारण टेलिग्रामने त्यांचे नवे चार दमदार फिचर्स रोलआउट केले आहे. यामध्ये वॉइस चॅट शेड्युल,वॉइस चॅटसाठी मिनी प्रोफाइल, नवे वेब वर्जन आणि पेंमेंट्स 2.0 सारखे फिचर्स दिले आहेत. WhatsApp प्रायव्हसीमुळे युजर्स गोंधळात सापडल्याने टेलिग्रामने याचा फायदा घेत त्यांची युजर्ससंख्या अधिक वाढवली आहे. टेलिग्रामने रोउलाउट केलेल्या या नव्या दमदार फिचर्स बद्दल जाणून घ्या अधिक.(SIM Card: काय तुमच्या नावावर अन्य कुणी सिमकार्ड वापरत आहे? दोन मिनिटांत अशी मिळवा माहिती)
टेलिग्रामचे Schedule Voice Chat हे फिचर युजर्सला तारीख आणि वेळेनुसार मेसेज शेड्युल करण्यासाठी वापरता येणार आहे. म्हणजेच जर तुम्हाला एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असल्यास तुम्ही मेसेज पाठवण्याचा वेळ शेड्युल करु शकता. यासाठी अॅन्ड्रॉइड युजर्सला 3 डॉट्सवर क्लिक करुन स्टार्ट वॉइस चॅट ऑप्शनवर क्लिक करुन शेड्युल वॉइस चॅट ऑप्शन मिळणार आहे.
तसेच Profile Photo या फिचरच्या माध्यमातून युजर्सला आपला प्रोफाइल फोटो आणि बायो एडिट किंवा बदलता येणार आहे. यामध्ये चॅट स्क्रिनला बॅक करण्याची गरज नाही आहे. टेलिग्रामच्या या फिचरला मिनी प्रोफाइल असे नाव दिले आहे. आणखी एक फिचर म्हणजे टेलिग्राम वेब वर्जनमध्ये दोन नवे फुल्ली फिचर्ड वेब अॅप लॉन्च केले आहे. हे दोन्ही वेब अॅप डार्क मोड, अॅनिमिटेड स्किटर्स आणि चॅट फोल्डर्ससारख्या फिचर प्रमाणे सपोर्ट करणार आहे. या नव्या वेब अॅपचा वापर कोणत्याही डिवाइस किंवा डेस्कटॉपवर करता येणार आहे.(WhatsApp Pink Installation Link चे मेसेजेस Malware!सुरक्षित राहण्यासाठी काय कराल? घ्या जाणून)
आणखी एक महत्वाचे फिचर म्हणजे युजर्सला पेमेंट सुद्धा टेलिग्रामच्या माध्यमातून करता येणार आहे. या फिचरचा वापर डेस्कटॉपवर सुद्धा केला जाऊ शकतो. Telegram पेमेंट करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कमिशन घेतले जाणार नाही आहे. याशिवाय पेमेंट डिटेल्स ही सेव्ह केले जाणार आहे.