ई-कॉमर्स वेबसाईट्सला लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक नसलेल्या गोष्टी पुरवण्यास बंदी, गृहमंत्रालयाचे आदेश
मात्र आता गृहमंत्रालयाने (Home Ministry) ई-कॉमर्स वेबासाईट्सला लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक नसलेल्या गोष्टी विकण्यावर बंदी घातली आहे.
देशभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याने येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र येत्या 20 एप्रिल पासून काही गोष्टीं बाबत सूट देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार 20 एप्रिल पासून ई-कॉमर्स वेबासईट्सवरील सेल सुरु होणार होणार असल्याचे यापूर्वीच्या मार्गदर्शक तत्त्वात स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार ई-कॉमर्स कंपन्या (E-Commerce Companies) मोबाईल, रेफ्रिजरेटर्स, टीव्ही आणि स्टेशनरी गोष्टींची विक्री करु शकतात असे म्हटले होते. मात्र आता गृहमंत्रालयाने (Home Ministry) ई-कॉमर्स वेबासाईट्सला लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक नसलेल्या गोष्टी विकण्यावर बंदी घातली आहे.
मार्गदर्शक तत्त्वांच्या नोटीस मध्ये सुधारणा करुन त्यामध्ये आरोग्य संबंधित सुविधा, शेती आणि बागकाम, पशूसंवर्धन शेती या कामांना परवानगी दिली आहे. मात्र यापूर्वीच्या नोटीसमध्ये मोबाईल फोन, टीव्ही, रेफ्रिजरेटर, लॅपटॉप आणि स्टेशनरी वस्तूंची विक्री सुरु करण्यात येणार आहे. या वस्तू ग्राहकांना ई-कॉमर्स वेबसाईट्स म्हणजे फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि स्नॅपडिल येथून खरेदी करता येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु आता अत्यावश्यक नसलेल्या गोष्टींचा पुरवठा ई-कॉमर्स कंपन्यांना करता येणार नसल्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.(मोबाईल, टीव्ही, रेफ्रिजरेटर्स सेल ई-कॉमर्स वेबसाईट्स Amazon, Flipkart आणि Snapdeal वर 20 एप्रिल पासून सुरु होणार)
दरम्यान, एखाद्या वस्तूची डिलिव्हरी करण्यासाठी लागणारे वाहन आणि त्यासंबंधित परवानगी स्थानिक सरकारकडून घेणे अत्यावश्यक असणार आहे. 25 मार्चपासून लॉकडाउनचे आदेश लागू केल्यानंतर बंद पडलेल्या औद्योगिक व व्यावसायिक कार्याला चालना देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांप्रमाणे या निर्णयाकडे पाहिले जात आहे. ई-कॉमर्स वेबासाईट्ससाठी मोठ्या संख्यने लोक काम करतात.