सध्या कुठे असेल चांद्रयान 2 आणि कसे पोहचेल चंद्रावर?; जाणून घ्या ISRO च्या या उपग्रहाचे मार्गक्रमण (Video)
भारताला या मोहिमेसाठी 1 हजार पेक्षा कमी खर्च आला आहे. 15 जुलैला हे प्रेक्षेपण होणार होते मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे 22 जुलैला हे उड्डाण झाले. आता इस्रोने त्यांच्या पुढील प्रकल्पाची तयारी सुरु केली आहे.
काल इस्रोचा (ISRO) महत्त्वाकांक्षी प्रकल्प चांद्रयान-2 (Chandrayaan 2) अवकाशात झेपावला. भारतीय वेळेनुसार 22 जुलै दुपारी 2.43 मिनिटांनी या उपग्रहाने उड्डाण घेतले. चांद्रयान- 2 मध्ये लँडर, रोवर आणि ऑर्बिटर असे तीन भाग आहेत. चंद्रावरील खनिजांचा अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवण्यात आले आहे. चंद्राच्या ज्या भागाचा कोणी अभ्यास केला नाही अशा जागेवर हे यान उतरणार आहे. 978 कोटी रुपये खर्च केलेल्या या प्रकल्पाद्वारे 48 दिवसांनी हे यान चंद्रावर पोहोचणार आहे. तर सध्या हे यान कुठे असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना ? चला पाहूया कसे असेल या यानाचे मार्गक्रमण
इस्रोची ही फार महत्वाची मोहीम आहे. ही मोहीम जर का यशस्वी झाली तर, रशियानंतर भारत हा पाचवा देश ठरणार आहे.
- 16 मिनिटांच्या उड्डाणानंतर GSLV-Mk III रॉकेटकडून चांद्रयान-2 ला त्याच्या 170x39,120 किलोमीटरच्या कक्षामध्ये सोडले जाईल.
- पहिले 17 ते 23 दिवस हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत असेल, त्यानंतर साधारण 1.05 लाख किलोमीटरचा टप्पा पार केल्यावर ते पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडेल.
- 23 ते 30 दिवसांमध्ये ते लुनार ट्रान्सफर ट्रॅजेक्टरी मध्ये प्रवेश करेल.
- साधारण 43 व्या दिवशी लँडर्स वेगळे होतील व हे यान 100 X 100 किमी गोलाकार कक्षामध्ये आणले जाईल.
- त्यानंतर याच कक्षेतून यानाचा प्रवास सुरु होईल, साधारण 48 व्या दिवशी चंद्रावर हे यान उतरले जाईल. (हेही वाचा: चांद्रयान-2 नंतर आता इस्रोची 'सूर्य मोहीम'; 2020 मध्ये आदित्य-एल 1 झेपावणार आकाशात, जाणून घ्या वैशिष्ठ्ये)
बीबीसीच्या अहवालानुसार, इंधन वाचवण्यासाठी इस्रोने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा फायदा करून घेऊन चक्रीय मार्गाचा वापर केला आहे.
याआधी अमेरिका, चीन, रशिया आणि जपान या देशांनी अशा प्रकारची मोहीम फत्ते केली आहे. भारताला या मोहिमेसाठी 1 हजार पेक्षा कमी खर्च आला आहे. 15 जुलैला हे प्रक्षेपण होणार होते मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे 22 जुलैला हे उड्डाण झाले. आता इस्रोने त्यांच्या पुढील प्रकल्पाची तयारी सुरु केली आहे. इस्रोचे पुढील मिशन हे सूर्यावरील असेल. या मिशनचे नाव आदित्य –एल1 (Aditya-L1)असून, 2020 मध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.