Surya Grahan 2022 Live Streaming: सूर्य ग्रहण सुरक्षितपणे अनुभवण्यासाठी इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)
या सावलीतून सूर्यग्रहणाची स्थिती निर्माण होते.
भारतामध्ये यंदा 25 ऑक्टोबर दिवशी वर्षातलं शेवटचं खंडग्रास सूर्यग्रहण (Surya Grahan) दिसणार आहे. हे ग्रहण भारतामधून दिसणार असल्याने ज्यांना खगोलीय घटनांचं कुतुहूल आहे त्यांना त्याचं आकर्षण आहे. थोडीशी काळजी घेत तुम्ही थेट डोळ्यांनीही तुम्ही हे सूर्यग्रहण पाहू शकणार आहात. पण तुम्हांला हे ग्रहण ऑनलाईन पहायचं असल्यास त्याची देखील सोय करण्यात आली आहे. युट्युब वर तुम्हांला खंडग्रास सूर्यग्रहण ऑनलाईन पाहता येणार आहे. सूर्यग्रहण ही सामान्य खगोलीय घटना आहे त्यामुळे धार्मिक मान्यतांना दूर ठेवून त्याचा अनुभव बिनधास्त घेऊ शकता. त्यामध्ये शुभ- अशुभ हा भेदाभेद आणू नका. नक्की वाचा: Surya Grahan 2022 Sutak Timings: 25 ऑक्टोबरच्या सूर्यग्रहणात सुतक काळ पहा किती वेळ पाळायचा?
दरम्यान 25 ऑक्टोबरचं सूर्यग्रहण भारतात सर्वाधिक काळ गुजरातच्या द्वारका प्रांतामध्ये अनुभवता येणार आहे तर सर्वात कमी वेळ कोलकाता मध्ये दिसणार आहे. पण हे ग्रहण थेट कोणतीही उपकरणं न वापरता पाहणं टाळा. यामुळे डोळ्यांचं नुकसान होऊ शकतं. मुंबईत हे ग्रहण संध्याकाळी 4.49 वाजता सुरू होईल. पण ग्रहण संपण्याआधीच संध्याकाळी 6.08 ला सूर्यास्त होणार आहे. त्यामुळे ग्रहणातच सूर्यास्त होताना पहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, औरंगाबाद मधील ग्रहणाच्या वेळा पहा इथे!
सूर्यग्रहण 2022 लाईव्ह स्ट्रिमिंग
जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून सूर्यग्रहणाची स्थिती निर्माण होते. भारतासोबतच 25 ऑक्टोबरला आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, यूरोप आणि आफ्रिका खंडामध्ये पाहता येणार आहे.