SpaceX Starship Destroyed: 'स्पेसएक्स स्टारशीप' त्याच्या 7व्या लॉन्च नंतर कोसळलं; Elon Musk यांनी व्हिडिओ पोस्ट करत पहा काय दिली प्रतिक्रिया (Watch Video)
कंपनीचे CEO Elon Musk यांनी देखील स्टारशीप रॉकेट कोसळत असल्याचा व्हिडिओ त्यांच्या X वरील अकाऊंट वर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी "entertainment is guaranteed" असं कॅप्शन दिलं आहे.
SpaceX कडून Starship rocket लॉन्च करण्यात आले होते मात्र हे स्पेसस्क्राफ्ट कोसळले आहे. Boca Chica, Texas, येथील अवकाशामध्ये 5:38 pm EST वाजता लॉन्च करण्यात आले होते मात्र हा प्रयत्न यशस्वी झालेला नाही. हा कंपनीचा सातवा प्रयत्न होता आणि तो देखील अपयशी ठरला आहे. अमेरिकेतील टेक्सास मधील SpaceX Mission Control चा स्टारशीप सोबत आठव्या मिनिटाला संपर्क तुटला. SpaceX Communications Manager Dan Huot यांनी ही माहिती लाईव्ह स्ट्रिम मध्ये दिली आहे. स्टारशीपचे तुकडे होऊन ते कोसळत असल्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये चर्चे आहे.
कंपनीचे CEO Elon Musk यांनी देखील स्टारशीप रॉकेट कोसळत असल्याचा व्हिडिओ त्यांच्या X वरील अकाऊंट वर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी "entertainment is guaranteed" असं कॅप्शन दिलं आहे. टेक्सासमधील मेक्सिकोच्या खाडी वरून या यानाने उड्डाण केले आणि यानासोबत 10 डमी उपग्रह पाठवण्यात आले होत्र. अंतराळयान अपग्रेड झाल्यानंतर स्टारशिप रॉकेटचे हे पहिले उड्डाण होते. 400 फूट (123 मीटर) लांब स्टारशिप अंतराळयान हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात शक्तिशाली रॉकेट होते. जेव्हा रॉकेटशी संपर्क तुटला तेव्हा ते 146 किलोमीटर उंचीवर होते आणि ताशी 13,245 मैल वेगाने उडत होते.
जेफ बेझोसच्या ब्लू ओरिजिनने देखील स्टारशीप च्या रॉकेट पूर्वी फ्लोरिडामध्ये सर्वात नवीन सुपरसाइज्ड रॉकेट, न्यू ग्लेन लाँच केले. रॉकेट त्याच्या पहिल्या उड्डाणात कक्षेत पोहोचला, यशस्वीरित्या एक प्रायोगिक उपग्रह पृथ्वीच्या वर हजारो मैलांवर ठेवला. पण पहिल्या टप्प्यातील बूस्टर अटलांटिकमधील तरंगत्या प्लॅटफॉर्मवर त्याचं अपेक्षित लॅन्डिग तो करू शकलेला नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)