काय सांगता? आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material
आता विकसित केला गेलेला नवीन पदार्थ आधीच्या मटेरीअलपेक्षा थोडा वेगळा आहे
फोनची स्क्रीन क्रॅक होणे किंवा तुटणे ही दुर्दैवी घटना आहे जी आपण सर्वांनीच आयुष्यात कधी ना कधी अनुभवली असेल. मात्र आता भविष्यात आपल्याकडे अशी गॅझेट असू शकतील, जी तुटल्यावर स्वतःची ठीक होतील (Self-Healing Material) आणि आपल्याला त्याची कल्पनाही नसणार. लवकरच नवीन मटेरीअलसह हे शक्य आहे की अंतराळ यान इ. मध्ये वापरलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब झाल्यास ते स्वत:च स्वतःची दुरुस्ती करू शकतील. शास्त्रज्ञांनी असा एक पदार्थ विकसित केला आहे, जो यांत्रिक टक्करमुळे निर्माण झालेल्या इलेक्ट्रिकल चार्जच्या मदतीने स्वतःचे झालेले यांत्रिक नुकसान स्वतः ठीक करू शकेल.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार आयआयएसईआर कोलकाता आणि आयआयटी खडगपूर यांनी संयुक्तपणे हा पदार्थ किंवा हे मटेरीअल तयार केले आहे. या टीमने अलीकडेच विज्ञान जर्नलमध्ये नवीन ‘सेल्फ-हिलिंग क्रिस्टलाईन पदार्था’बाबत माहिती दिली आहे. संशोधकांनी, पायझोइलेक्ट्रिक मॉलिक्यूलर क्रिस्टल (Piezoelectric Molecular Crystals) तयार केले आहेत, जे कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाच्या मदतीशिवाय स्वत: ठीक होऊ शकतील
अंतराळयानातील नादुरुस्त झालेल्या विद्युत उपकरणांची दुरुस्ती आपोआप होणे नजीकच्या भविष्यात शक्य होणार आहे . नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक भाग आपणहून दुरुस्त होतील असा घटक पदार्थ भारतीय शास्त्रज्ञांनी नुकताच विकसित केला आहे. हा पदार्थ आपल्यामधील यांत्रिक दुरुस्त्या या यांत्रिक परिणामाने उत्पन्न होणाऱ्या विद्युत प्रभारांच्या मदतीने स्वतःहून दुरुस्त करू शकेल.
आपण नेहमी वापरत असलेली उपकरणे यांत्रिक नादुरुस्तीमुळे बरेचदा बंद पडतात अशा उपकरणांच्या दुरुस्तीची किंवा ते बदलण्याची गरज आपल्याला भासते . त्यामुळे ती उपकरणे ज्याचा भाग आहे त्या वस्तूचे आयुष्य कमी होते व त्याचा देखभाल खर्चही वाढतो. अंतराळ यानासारख्या अनेक ठिकाणी दुरुस्तीसाठी मानवी हस्तक्षेप शक्य नसतो. ही गरज लक्षात घेऊन कोलकाता येथील भारतीय विज्ञान आणि संशोधन संस्थेने (IISER)आयआयटी खरगपुरच्याया सहयोगाने पायझो-इलेक्ट्रिक रेणवीय स्फटिक विकसित केले आहेत.
संशोधकांनी सांगितले की यापूर्वी विकसित केलेले स्वतः ठीक होणारे मटेरीअल एरोस्पेस, अभियांत्रिकी आणि ऑटोमेशनमध्ये वापरले जात आहे. आता विकसित केला गेलेला नवीन पदार्थ आधीच्या मटेरीअलपेक्षा थोडा वेगळा आहे. संशोधकांनी दावा केला आहे की, त्यांनी नवीन ठोस पदार्थाचा एक नवीन वर्ग तयार केला आहे जो इतर प्रतिस्पर्धी मटेरीअलपेक्षा 10 पट कठिण आहे. पूर्वी विकसित केलेला पदार्थ स्वतः ठीक होण्यास प्रकाश, उष्णता किंवा केमिकलची मदत घेतो. मात्र आता विकसित झालेला हा पदार्थ ठीक होण्यासाठी स्वतःचा इलेक्ट्रिकल चार्ज वापरतो. (हेही वाचा: Space Tourism: कोट्टायमचे Santhosh George बनणार भारतामधील पहिले अंतराळ पर्यटक; 2007 मध्येच बुक केली होती सीट)
यांत्रिक प्रभावामुळे इलेक्ट्रिक चार्ज व्युत्पन्न करण्याची अनोखी क्षमता असल्याने, खराब झालेल्या किंवा तुटलेल्या भागाचे तुकडे विद्युत चार्ज तयार करतात, जे खराब झालेल्या भागांद्वारे स्वतःकडे खेचले जातात आणि दुरुस्त केले जातात. प्रक्रिया सुरुवातीला आयआयएसईआर कोलकाता टीमद्वारे प्रोफेसर सी मल्ला रेड्डी यांच्या नेतृत्वात विकसित केली होती, ज्यांना भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून स्वर्णजयंती फेलोशिप (2015 ) मिळाली होती.