Mysterious Radio Signal: आपल्या आकाशगंगेमध्ये प्रथमच आढळले रहस्यमय असे Fast Radio Burst; खगोलशास्त्रीय कोडे सोडविण्यास शास्त्रज्ञांनी शोधून काढले 'Magnetic Star'
तसेच एकावेळी काही मिलिसेकंद त्यांचा स्फोट होतो. आतापर्यंत हे सर्व स्फोट आपल्या आकाशगंगेच्या बाहेरून दिसले होते आणि ते काही अब्जावधी प्रकाश-वर्षे दूर होते.
फास्ट रेडिओ बर्स्ट (FRBs) म्हणून ओळखले जाणारे रेडिओ तरंग (Radio Waves) रात्रीच्या आकाशात दर सेकंदाला एकदा दिसू शकतात. तसेच एकावेळी काही मिलिसेकंद त्यांचा स्फोट होतो. आतापर्यंत हे सर्व स्फोट आपल्या आकाशगंगेच्या बाहेरून दिसले होते आणि ते काही अब्जावधी प्रकाश-वर्षे दूर होते. परंतु आता पहिल्यांदा खगोलशास्त्रज्ञांनी आपल्या सौर यंत्रणेतील कॉस्मिक रेडिओ लहरींचा स्फोट झाल्याचे शोधून काढणे आहे. महत्वाचे म्हणजे त्यांनी ही घटना नक्की कुठे घडली याचीही माहिती मिळवली आहे. फास्ट रेडिओ बर्ट्स सामान्यत: एक्स्ट्रॅगॅलेक्टिक (Extragalactic) असतात, याचा अर्थ असा होतो की, ते आपल्या आकाशगंगेच्या बाहेर तयार होतात. मात्र, यावर्षी 28 एप्रिलला, अनेक टेलिस्कोपने (Telescope) आपल्या मिल्की वे (Milky Way) प्रदेशात एकाच भागातून प्रकाशमान FRB चा शोध लावला.
खगोलशास्त्रज्ञांच्या गटाने आपल्या आकाशगंगेमधून रेडिओ लहरींचा छोटा आणि शक्तिशाली स्फोट निर्माण झाल्याचे शोधून काढले. खगोलशास्त्रज्ञांनी या विचित्र सिग्नलचा स्रोतही शोधला आहे. यामुळे आतापर्यंत नोंदवलेल्या सर्वात रहस्यमय वैश्विक सिग्नलचे कारण शोधून काढले जाऊ शकते. नेचर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या तीन अभ्यासानुसार, वैज्ञानिकांच्या आंतरराष्ट्रीय गटाने हा स्फोट 'एफआरबी' असल्याचे सांगितले आहे. ही घटना आपल्या आकाशगंगेमध्ये घडल्याने याचे महत्व वाढले आहे, कारण याआधी असे स्फोट आपल्या आकाशगंगेच्या बाहेर नेहमीच घडत होते.
अनेक वर्षांपासून संशोधकांना याच गोष्टीचे आश्चर्य वाटत होते की, हे शक्तिशाली स्फोट नक्की कशामुळे उद्भवू शकतात? तारे फुटण्यापासून ते परग्रहवासी तंत्रज्ञानापर्यंत सर्व शक्यतांचा विचार करण्यात आला होता. परंतु त्यांना आता मॅग्नेटर्सबद्दल (Magnetar) खात्री पटली आहे. हा एक अत्यंत शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र असलेल्या मोठ्या ताराच्या विस्फोटानंतर उरलेला एक तरुण न्यूट्रॉन तारा असतो. (हेही वाचा: Venus Is A Russian Planet? शुक्र हा रशियन ग्रह असल्याचा रशिया स्पेस एजन्सीचा दावा, वाचा सविस्तर)
एफआरबीचा अभ्यास करणे अत्यंत अवघड आहे कारण ते लवकर संपून जातात. हे तीव्र रेडिओ स्फोट कशामुळे घडतात यावर कार्य करण्यासाठी अॅस्ट्रोफिजिकिस्ट्सनी धडपड केली आहे. आताचा नवीन सिग्नल म्हणजे विशिष्ट स्त्रोतास पिन केलेला पहिला रेडिओ स्फोट होय. याबाबत डेनिअल मिचिली म्हणाले, 'आकाशगंगेमध्ये असणाऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा हे रेडिओ स्फोट हजारो ते कोट्यावधी पट अधिक शक्तिशाली आहेत.’ शास्त्रज्ञांना वाटते की ते इतके वेगवान आहेत की ते आपल्या आकाशगंगेमधून दिवसातून 1,000 पेक्षा जास्त वेळा बाहेर येऊ शकतात परंतु ते शोधणे सोपे नाही.