Human Sweat: बाबो! आता मानवी घामामधून होणार विजेची निर्मिती; संशोधकांनी सादर केली New Technology, जाणून घ्या सविस्तर (Watch Video)

विज्ञान कोणत्या स्तरावर प्रगती करीत आहे याचे एक भन्नाट उदाहरण पुन्हा एकदा पहायला मिळाले आहे. यूसी सॅन डिएगो जेकब्स स्कूल ऑफ इंजीनियरिंगच्या काही संशोधकांनी हातावर बसवण्यात येणाऱ्या अशा उपकरणाचा शोध लावला आहे, ज्याद्वारे व्यक्तीच्या घामामधून (Human Sweat) वीज निर्मिती (Electricity) केली जाऊ शकते

मानवी घामामधून विजेची निर्मिती (संग्रहित संपादित प्रतिमा)

विज्ञान कोणत्या स्तरावर प्रगती करीत आहे याचे एक भन्नाट उदाहरण पुन्हा एकदा पहायला मिळाले आहे. यूसी सॅन डिएगो जेकब्स स्कूल ऑफ इंजीनियरिंगच्या काही संशोधकांनी हातावर बसवण्यात येणाऱ्या अशा उपकरणाचा शोध लावला आहे, ज्याद्वारे व्यक्तीच्या घामामधून (Human Sweat) वीज निर्मिती (Electricity) केली जाऊ शकते. हे डिव्हाइस 10 तास परिधान केल्यावर मानवी घामापासून इतकी उर्जा निर्माण होईल की, एक इलेक्ट्रॉनिक मनगटी घड्याळ 24 तासांसाठी चार्ज होईल. संशोधकांनी सांगितले की, हे उपकरण बोटांवर जोडले जाऊ शकते व  हे यंत्र बोटांवरील घामामधून वीज निर्माण करेल.

मानवी बोटांवर फार जास्त प्रमाणात घाम असतो, अशा परिस्थितीत स्मार्ट स्पॉन्गिंग मटेरियलच्या मदतीने घाम एकत्र केला जाईल आणि कंडक्टर्स ते विजेमध्ये रूपांतरित करतील. या यंत्राबाबतचे संशोधन अद्याप सुरूवातीच्या टप्प्यात आहे, म्हणून हे प्रोटोटाइप डिव्हाइस याक्षणी केवळ मर्यादित उर्जा निर्माण करू शकते. जर हे डिव्हाइस सलग 3 आठवड्यांसाठी हातावर परिधान केले तर, एका स्मार्टफोन चार्ज करण्याइतपत वीज तयार केली जाईल.

मात्र, या यंत्राची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या अंगावर परिधान करण्याजोग्या सर्व उपकरणांमध्ये वीज निर्मितीसाठी व्यायाम किंवा शारीरिक श्रम आवश्यक आहेत. परंतु या अद्वितीय डिव्हाइसमध्ये त्याची गरज नाही. यासह झोपेत असतानाही वीज निर्माण केली जाऊ शकणार आहे. सोबतच टायपिंग, मेसेज टेक्स्टिंग यासारख्या कामांमध्ये बोटांवर जमा होणारा घामही वीजनिर्मिती करेल. (हेही वाचा: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाजवळ 10 युएफओ कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचा दावा; Aliens च्या अस्तित्वाबाबत चर्चेला उधाण (Watch Video)

संशोधन पथकात सहभागी कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्रोफेसर जोसेफ वोंग म्हणतात की, बोटाचे टोक ही अशी जागा आहे जिथे आपण काहीही न करता घाम झालेला असतो. त्यामुळे हे डिव्हाइस परिधान करण्याची ती योग्य जागा आहे. या प्रयोगामध्ये, एका फिंगर चार्जरला रसायनिक सेन्सरसह कमी उर्जा स्क्रीनशी कनेक्ट केले गेले. संशोधनात आढळले की, केवळ 2 मिनिटांत ते स्क्रीन व सेन्सर चालवू शकेल इतकी उर्जा निर्माण करीत होते. आता शास्त्रज्ञ एक व्यावहारिक उपकरण बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत, जेणेकरुन त्याचा वापर इलेक्ट्रॉनिक वस्तू चार्ज करण्यासाठी केला जाऊ शकेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now