शाब्बास रे पठ्‌ठ्या, पुणेकर काहीही करु शकतात! 12 वर्षीय हाजीक काझी याने लावला समुद्रातील प्लास्टिक काढण्याचा शोध

जगभरातील संशोधकांनी आपले अनेक प्रयत्न समुद्रातील जलशुद्धीवर पाण्यात घातले आहेत. पण, उपाय सापडला नाही. हाजीक काझीने मात्र यावर प्रभावी उपाय शोधून काढला आहे. हाजीकने एका विशिष्ट प्रकारच्या जहाजाची निर्मिती केली आहे. हे जहाज सुद्रातील पाण्यात फिरवल्यास समुद्रातील प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा करुन बाहेर काढता येऊ शकते. ERVIS असे या जहाजाचे नाव आहे.

Haaziq Kazi | (Photo courtesy: ANI)

होय, 'पुणे तिथे काय उणे' ही म्हण पुणेकरांनी अनेकदा सार्थ करून दाखवली आहे. पुणेकर काहीही करु शकतात. 12 वर्षीय हाजीक काझी (Haaziq Kazi) या बालवैज्ञानिकाने पुन्हा एकदा हे सिद्ध करुन दाखवले आहे. समुद्रातील पाण्याचे होत असलेल्या प्रदुषणामुळे अवघे जग हैराण आहे. जगभरातील संशोधकांनी आपले अनेक प्रयत्न समुद्रातील जलशुद्धीवर पाण्यात घातले आहेत. पण, उपाय सापडला नाही. हाजीक काझीने मात्र यावर प्रभावी उपाय शोधून काढला आहे. हाजीकने एका विशिष्ट प्रकारच्या जहाजाची निर्मिती केली आहे. हे जहाज सुद्रातील पाण्यात फिरवल्यास समुद्रातील प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा करुन बाहेर काढता येऊ शकते. ERVIS असे या जहाजाचे नाव आहे. हाजीकच्या या संशोधनामुळे समुद्री जीव आणि जलसंवर्धन (Save Marine Life) करता येणे शक्य होणार आहे.

एएनआय या संस्थेने हाजीक काझी याच्याशी संपर्क साधून वृत्त दिले आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना हाजीकने सांगितले की, हाजीकने सांगितले की, जलप्रदुषणावरील अनेक डॉक्ट्युमेन्ट्री मी पाहिल्या. त्या पाहिल्यानंतर या विषयाचे मला केवळ गांभीर्यच पटले नाही तर, काळजी वाटू लागली. जगभरात या विषयावर संशोधन सुरु आहे. त्याला यश येईल तेव्हा येईल. पण, या विषयात आपणच काहीतरी करायला हवे, या कल्पनेने मला झपाटले. मी काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी समुद्रातील कचरा काढणाऱ्या जहाजांविषयी सर्व माहिती शोधली. ती जाणून घेतली आणि प्रत्यक्ष संशोधन सुरु केले. (हेही वाचा, नासा कॅलेंडर 2019: भारतीय कन्या दीपशिखा हिचे चित्र मुखपृष्ठावर; महाराष्ट्राच्या इंद्रयुद्धच्या कलेलाही मानाचे स्थान)

पुढे बोलताना हाजीक सांगतो, समुद्रातील जलप्रदुषण या विषयावर मी जो काही अभ्यास केला. त्यातून मला लक्षात आले की, ही एक साखळी आहे. आपण प्लास्टिक वापरतो. ते समुद्रात टाकतो. समुद्रातील प्राणी (मासे वैगेरे) ते खातात. हेच मासे आपण खातो. म्हणजेच काय तर हे प्लास्टिक पुन्हा आपल्यास अन्नात येते. म्हणजे पुन्हा तेच चक्र. मात्र ERVIS या जहाजाद्वारे आपण समुद्रातील हा कचरा एकत्र करता येऊ शकतो. या कचऱ्यात समुद्रातील प्राणी, जीव, पाणी येऊ शकतात. पण, त्याचे तीन भाग करता येतात. त्यातून पाणी आणि समुद्री जीव हे पुन्हा एकाद समुद्रात सोडता येतील. कचरा बाहेर ठेवता येईल. या कचऱ्याचेही पाच वेगवेगळे भाग करुन त्याची विल्हेवाट लावता येऊ शकते.

दरम्यान, हाजिकच्या ERVIS या जहाजाचा टेडएक्स आणि टेड 8 यांसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही समावेश झाला आहे. त्यामुळे सध्या त्याच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.