Samsung कंपनीची Reward Yourself ऑफर, लेटेस्ट स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची ग्राहकांना मिळणार संधी

Samsung (Photo Credit-Twitter)

स्मार्टफोन निर्माती कंपनी Samsung ने सणासुदीचे दिवस लक्षात ठेवत Reward Yourself ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना स्मार्टफोन ते टॅबलेट पर्यंतच्या गोष्टी खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या व्यतिरिक्त ग्राहकांना सर्व इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर सुद्धा आकर्षक डील ही दिली जाणार आहे. तर सॅमसंग कंपनीची Reward Yourself ऑफर ही 15 तारखेपासून सुरु झाली आहे. ही ऑफर येत्या 27 सप्टेंबर पर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.(Amazon Great Indian Festival Sale 2020: अमेझॉनच्या सेलमध्ये Prime Members ना Apple iPhone 11 सह अन्य फोन, टीव्ही वर मिळत आहेत 'या' दमदार ऑफर्स!)

सॅमसंग कंपनीच्या या ऑफर अंतर्गत ग्राहकांना HDFC बँकेकडून 4999 ते 1,04,999 रुपयांपर्यंत स्मार्टफोन, टॅबलेट आणि स्मार्ट Veriable च्या खरेदीवर 10 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. त्याचसोबत SBI च्या क्रेडिट कार्ड होल्डर्सला 4999 ते 47,999 रुपयांपर्यंत गॅलेक्सी स्मार्टफोन आणि टॅबलेटवर 10 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. या कॅशबॅकचा लाभ 28 ऑक्टोंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत घेता येणार आहे.(Samsung ने लॉन्च केला नवा एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन, जाणून घ्या किंमतीसह फिचर्स)

तर Samsung Galaxy Note 20 वर Reward Yourself ऑफर अंतर्गत ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर 10 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. या कॅशबॅकचा फायदा 16 ते 25 ऑक्टोंबर दरम्यान घेता येणार आहे. दुसऱ्या बाजूला गॅलेक्सी A सीरिज मधील डिवाइस No Cost EMI वर खरेदी करता येणार आहे.त्याचसोबत नव्या ऑफर अंतर्गत ग्राहकांना गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रा च्या खरेदीवर 13 हजार रुपयांना अपग्रेड बोनस आणि 7 हजार रुपयांचा सॅमसंग वाउचर मिळणार आहे. या ऑफरचा फायदा 25 ऑक्टोंबर पर्यंत घेता येणार आहे. तसेच UV Sterilizer, गॅलेक्सी ए71, ए51 आणि ए31 स्मार्टफोनवर 50 टक्के कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे.