Samsung Galaxy Note 20 आणि Galaxy Note 20 Ultra भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध, जाणून घ्या किंमतीसह फिचर्स
सॅमसंग कंपनीने Galaxy Unpacked 2020 मध्ये त्यांचा बहुप्रतिक्षित Galaxy Note 20 सीरिज अंतर्गत दोन नवे स्मार्टफोन Galaxy Note 20 आणि Galaxy Note 20 Ultra लॉन्चला ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केला आहे.
सॅमसंग कंपनीने Galaxy Unpacked 2020 मध्ये त्यांचा बहुप्रतिक्षित Galaxy Note 20 सीरिज अंतर्गत दोन नवे स्मार्टफोन Galaxy Note 20 आणि Galaxy Note 20 Ultra लॉन्चला ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. यासह कंपनीने या इवेंटमध्ये Galaxy Note 20 सीरिज व्यतिरिक्त Galaxy Z Fold 2 फोल्डेबल फोन, Galaxy Tab S7 आणि Galaxy Tab S7+ टॅबलेट, Galaxy Watch 3 आणि Galaxy Buds Live ईअरबड्स सुद्धा बाजारात उपलब्ध करुन दिले आहेत. लॉन्चसह कंपनीने Galaxy Note 20 सीरिजला भारतीय बाजारात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध करुन दिला आहे. याची किंमतीबाबत खुलासा करण्यात आलेला नाही.
Samsung Galaxy Note 20 भारतात 77,999 रुपयांना उपलब्ध करुन दिला जाणार आहे. हा स्मार्टफोन 256GB स्टोरेजसह फक्त 4G वेरियंटमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर Galaxy Note 20 Ultra हा 5G वेरियंटमध्ये भारतात उपलब्ध करुन दिला जाणार आहे. यामध्ये 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1,04,999 रुपये आहे. ही सीरिज कंपनीने अधिकृत वेबसाईट आणि ऑफलाइन रिटेल स्टोरवर जाऊन प्री-बुकिंग करता येणार आहे.(एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन Realme C15 भारतात लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या फिचर्स)
Galaxy Note 20 च्या प्री-बुकिंगवर युजर्सला 6 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. तर Galaxy Note 20 Ultra 5G च्या प्री-बुकिंगवर 9 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जाणार आहे. याचसोबत ग्राहकांना त्यांच्याकडील सध्याचा स्मार्टफोन देऊन 5 हजारांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे. एक्सचेंज डिवाइसची किंमत त्याच्या मॉडेलवर निर्भर असणार आहे.(Samsung Galaxy M31s स्मार्टफोनमध्ये युजर्सला मिळणार धमाकेदार फिचर्स; 19,499 रुपयांत खरेदी करता येणार)
Galaxy Note 20 सीरिजमध्ये युजर्सला खास फिचर्सअंतर्गत eSIM सपोर्ट सुविधा मिळणार आहे. याचा लाभ Airtel आणि Jio नेटवर्कवरुन घेतला जाऊ शकतो. दोन्ही स्मार्टफोन Samsung Exynos 990 चिपसेट लैस असून यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.