1 जून पासून बदलणार नियम, Google आणि YouTube च्या 'या' सर्विससाठी द्यावे लागणार शुल्क

त्यामुळे युजर्सला जोरदार झटका लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच युजर्सला Google Photo ची मोफत सर्विससाठी शुल्क मोजावे लागणार आहेत.

Smartphone apps (Photo Credits: Unsplash)

टेक्नॉलॉजीच्या जगात येत्या 1 जून पासून दोन मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे युजर्सला जोरदार झटका लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच युजर्सला Google Photo ची मोफत सर्विससाठी शुल्क मोजावे लागणार आहेत. त्याचसोबत YouTube च्या माध्यमातून कमाई करणाऱ्यांना सुद्धा आता टॅक्स भरावा लागणार आहे. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरील युजर्सला युट्युब आणि गुगल फोटोच्या या बदलावांबद्दल अधिक सविस्तर जाणून घेणे आवश्यक आहे.(New Social Media Rules: सोशल मीडिया, WhatsApp यूजर्सनी घाबरु नये, आपल्या व्यक्तिगततेचा आम्हाला आदर- केंद्र सरकार)

गुगल फोटो मोफत क्लाउड स्टोरेजची सुविधा येत्या 1 जून पासून बंद होणार आहे. कंपनी या सुविधेसाठी आता पेड सब्सक्रिप्शन मॉडेल घेओऊन येणार आहे. कंपनीकडून त्याला Google One असे नाव देण्यात आले आहे. म्हणजेच आता गुगल कडून गुगल फोटो क्लाउड स्टोरेजसाठी पैसे आकारले जाणार आहे. सध्या यासाठी कोणताही शुल्क युजर्सकडून घेतला जात नव्हता. पण 1 जून नंतर 15GB पेक्षा अधिक फोटो आणि डॉक्युमेंट ऑनलाईन स्टोर केल्यास तर युजर्सला प्रतिमहिना 1.99 डॉलर (146 रुपये) आणि याचे वार्षिक सब्सक्रिप्शन 19.99 डॉलर म्हणजे (164 रुपये) द्यावे लागणार आहेत.

तसेच युट्युबवर व्हिडिओ टाकल्यानंतर त्यामधून पैसे मिळणे सर्वसामान्य झाले आहे. मात्र जून महिन्यापासून युट्युबवरुन मिळणाऱ्या कमाईवर टॅक्स द्यावा लागणार आहे. दरम्यान, युट्युब च्या अमेरिकेतील कंटेट क्रिएटर्सकडून टॅक्स घेतला जाणार नाही आहे. परंतु भारतासह जगातील अन्य ठिकाणच्या कंटेट क्रिएटर्सकडून युट्युबच्या कमाईकवर टॅक्स भरावा लागणार आहे. तुम्हाला फक्त अशाच Views चा टॅक्स द्यावा लागणार आहे जे तुम्हाला अमेरिकेती व्युअर्सकडून मिळाले आहेत. युट्युबच्या या नव्या टॅक्स पॉलिसीची सुरुवात जून 2021 पासून सुरु होणार आहे. या टॅक्स पॉलिसीमध्ये भारतीय युट्युब कंटेट क्रिएटर्सचा सुद्धा समावेश असणार आहे. त्यांना कमाईच्या 24 टक्के प्रतिमहिना अशा हिशोबाने टॅक्स द्यावा लागणार आहे. युट्युब कंटेट क्रिएटर्सला नव्या नियमाअंतर्गत आपली कमाई 31 मे पूर्वी सांगावी लागणार आहे. अशातच गुगलकडून युट्युब कंटेट क्रिएटर्स कडून 15 टक्के हिशोबाने टॅक्स वसूल केला जाणार आहे. तसेच 31 मे पर्यंत कमाईचा खुलासा न केल्यास कंपनी युजर्सकडून 24 टक्के टॅक्स घेणार आहे.