Reliance Jio चा 350GB डेटासह नवा लॉन्ग टर्म प्लॅन लॉन्च
तसेच कंपनीने त्यांचे काही प्रीपेड प्लॅनसुद्धा बंद केले होते. ज्यामध्ये लॉन्ग टर्म प्लॅनचा सुद्धा समावेश होता. रिलायन्स जिओ यांनी पुन्हा एकदा बंद करण्यात आलेल्या 4999 रुपयांचा लॉन्ग टर्म प्लॅन लॉन्च केला आहे
रिलायन्स जिओ (Reliance Jio) यांनी डिसेंबर 2019 मध्ये सर्व प्रीपेड प्लॅन्समध्ये बदल केला होता. तसेच कंपनीने त्यांचे काही प्रीपेड प्लॅनसुद्धा बंद केले होते. ज्यामध्ये लॉन्ग टर्म प्लॅनचा सुद्धा समावेश होता. रिलायन्स जिओ यांनी पुन्हा एकदा बंद करण्यात आलेल्या 4999 रुपयांचा लॉन्ग टर्म प्लॅन लॉन्च केला आहे. दरम्यान, लॉन्च करण्यात आलेला नवा प्लॅन 360 दिवसांचा असणार आहे. मात्र डेटा आणि कॉलिंगमध्ये बदल झालेला दिसून येणार आहे. डिसेंबर मध्ये सर्व टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या कॉल आणि डेटा दरात बदल केले होते. त्यानंतर युजर्सला यापूर्वीच्या प्लॅनमध्ये डबल डेटा आणि कॉलिंगसाठी अधिक पैसे द्यावे लागत आहेत.
कंपनीने त्यांच्या ऑल इन वन प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सला अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी काही फ्री मिनिट्स ऑफर करतात. रिलायन्स जिओने नवे लॉन्ग टर्म प्लॅनमध्ये सुद्धा युजर्सला अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 12 हजार मिनिट्स फ्री कॉलिंग ऑफर करतात. या प्लॅनची वॅलिडिटी 360 दिवसांची आहे. तर आता युजर्सला फ्री मिनिट्सचा लाभ वर्षभर घेता येणार आहे. यामध्ये युजर्सला 350GB हाय स्पीड डेटा ऑफर केला जाणार आहे. (भाविकांना आता घरबसल्या चार धाम मंदिरातील आरतीचे लाईव्ह पाहता येणार, जिओ लवकरच सुरु करणार थेट प्रक्षेपण)