Reliance Jio च्या 155 रुपयांच्या रिचार्ज मध्ये युजर्सला मिळणार 1GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग
तर कंपनीने काही दिवसांपूर्वीच जिओ पोस्टपेड प्लस सेवा सुद्धा युजर्सला ऑफर करत आहे.
रिलायन्स जिओकडून (Reliance Jio) ग्राहकांना परवडतील अशा किंमतीत डेटा, कॉल आणि एसएमसची सुविधा देण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. तर कंपनीने काही दिवसांपूर्वीच जिओ पोस्टपेड प्लस सेवा सुद्धा युजर्सला ऑफर करत आहे. कंपनीकडे खासकरुन आपल्या Jio Phone ग्रहकांसाठी सुद्धा काही प्लॅन आणले आहेत. त्याबद्दल आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार असून त्याची किंमत फक्त 155 रुपये आहे.(BSNL कडून मोठी ऑफर; आता 109 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना मिळणार डबल डेटा आणि इतर काही खास फायदे)
जिओच्या 155 रुपयांच्या रिचार्ज पॅकची वॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या पॅकमध्ये ग्राहकांना प्रतिदिनी 1 जीबी डेटा मिळणार आहे. प्रत्येक दिवशी मिळणारा डेटा संपल्यास त्याची स्पीड कमी होऊन 64kbps होणार आहे. म्हणजेच ग्राहकांना एकूण 28जीबी डेटाचा वापर या प्लॅनमध्ये करता येणार आहे.
वॉइस कॉलिंग बद्दल बोलायचे झाल्यास IUC चार्ज हटवल्यानंतर अन्य प्लॅनसारखेच यामध्ये लोकल आणि एसटीडी कॉल प्रत्येक नेटवर्कवर पूर्णपणे फ्री मिळणार आहे. म्हणजेच कॉलिंगसाठी कोणताही FUP लिमिट नसणार आहे. ग्राहकांना प्रत्येक दिवसाला 100 एसएमएस सुद्धा फ्री मिळणार आहेत. या व्यतिरिक्त जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शनचे सुद्धा रिचार्ज या पॅकच्या माध्यमातून कोणत्याही अतिरिक्त शुक्लाशिवाय मिळणार आहेत.(Jio All In One Plans: जिओचे ऑल इन वन प्लॅन्स सादर; पहा काय आहेत ऑफर्स)
त्याचसोबत कंपनीकडे 185 रुपये, 125 रुपये आणि 75 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचा समावेश आहे. या पॅकमध्ये क्रमश: 56 जीबी,14 जीबी आणि 3 जीबी डेटा पॅक ऑफर केला जात आहे. या सर्व प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग व्यतिरिक्त 100 एसएमएस सुद्धा फ्री मिळणार आहेत.