Redmi Smartphones Sales: जबरदस्त ऑफर! रेडमी नोट प्रो, रेडमी नोट 9 प्रो मॅक्स, रेडमी नोट 9 या स्मार्टफोनच्या खरेदीवर तब्बल 4 हजारांपर्यंत सूट

नवरात्र, दसऱ्यानंतर आता ईद, दिवाळी अशा महत्त्वाच्या सणांची आगामी काही दिवसांत रेलचेल आहे. यामुळे अनेक स्मार्टफोन कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखताना दिसतात.

Redmi (Photo Credit- File Photo)

भारतामध्ये सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. नवरात्र, दसऱ्यानंतर आता ईद, दिवाळी अशा महत्त्वाच्या सणांची आगामी काही दिवसांत रेलचेल आहे. यामुळे अनेक स्मार्टफोन कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखताना दिसतात. यातच चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी रेडमीदेखील अशीच एक धमाकेदार ऑफर घेऊन आली आहे. कंपनीने या फेस्टीव सीजनमध्ये रेडमी नोट 9 प्रो (Redmi Note Pro), रेडमी नोट 9 प्रो मॅक्स (Redmi Note 9 Pro) आणि रेडमी नोट 9 (Redmi Note 9) च्या खरेदीवर विशेष सूट दिली आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना तब्बल 4 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. तसेच वरील तिन्ही स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाइटवरून एचडीएफसी बँक कार्डवरून खरेदी केल्यास 10 टक्के इंस्टेंट डिस्काउंटचा फायदा मिळणार आहे.

रेडमी नोट 9 प्रोची (4 जीबी रॅम/ 64 जीबी स्टोरेज) मूळ किंमत 16 हजार 999 रुपये आहे. परंतु, एमआयच्या ऑफिशल वेबसाईटवर सुरु असलेल्या या सेलमध्ये या स्मार्टफोनची किंमत केवळ 12 हजार 999 रुपये देण्यात आली आहे. त्यानंतर 64 मेगापिक्सल कॅमेऱ्याचा सेट अप असलेला स्मार्टफोन रेडमी नोट 9 प्रो मॅक्सच्या किंमतीवरही 4 हजारपर्यंत सूट देण्यात आली आहे. 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या रेडमी नोट 9 प्रो मॅक्सची मूळ किंमत 18 हजार 999 रुपये इतकी आहे. परंतु, ऑफर्स अंतर्गत हा स्मार्टफोन 15 हजार 999 रुपयाला खरेदी करता येऊ शकतो. तर, 48 मेगापिक्सल क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप रेडमी नोट 9 ची किंमत 14 हजार 999 इतकी आहे. परंतु, ऑफर्स अंतर्गत हा स्मार्टफोन केवळ 11 हजार 499 रुपयांत खरेदी करता येणार आहे. हे देखील वाचा- Reliance Jio च्या या स्वस्त प्लॅनमध्ये युजर्सला मिळणार अनलिमिटेड डेटासह कॉलिंगची सुविधा, जाणून घ्या अधिक

भारतीय स्मार्टफोन बाजारात रेडमी कंपनीच्या स्मार्टफोनला अधिक प्रसिद्ध मिळवली आहे. इतर कंपनीच्या तुलनेत रेडमी कंपनीचे स्मार्टफोन स्वस्त असतात. तसेच त्यांच्या किंमतीही कमी असतात. यामुळे रेडमी कंपनीच्या स्मार्टफोनला अधिक मागणी आहे.