Realme Narzo 10A स्मार्टफोनसाठी आज दुपारी 12 वाजता सेल, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमतीसह फिचर्स
Realme Narzo 10A स्मार्टफोनसाठी पुन्हा एकदा सेल आज दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. हा सेल कंपनीच्या अधिकृत वेबसाईट किंवा ई-कॉमर्स साइट Flipkart येथे असणार असून ग्राहकांना तेथून खरेदी करता येणार आहे. शिखाला परवडेल अशा किंमतीतील या स्मार्टफोनसाठी युजर्सला 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि MediaTek Helio G70 प्रोसेसर दिला जाणार आहे. तर स्मार्टफोन सेलमध्ये खरेदी पूर्वी जाणून घ्या त्याच्या किंमतीसह फिचर्सबद्दल अधिक.(भारतीयांमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारसरणीत बदल, 'या' गोष्टी पाहून Buy केला जातोय नवा मोबाईल)
Realme Narzo 10A भारतात दोन वेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. याच्या 3GB+32GB स्टोरेज मॉडेलची किंमत 8,999 रुपये आहे. तर 4GB+64GB स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत 9,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन ब्लू आणि व्हाइट या दोन रंगात उपलब्ध आहे. रिअलमीच्या Narzo10A स्मार्टफोन खरेदी केल्यास युजर्सला MobiKwik वर 500 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. तर फ्लिपकार्टवरुन तो No Cost EMI ऑप्शनसह खरेदी करता येणार आहे. तसेच Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5 टक्क्यापर्यंत अनलिमिटेड कॅशबॅक दिला जाणार आहे. तसेच Axis Bank Buzz क्रेडिट कार्डवर 5 टक्के ऑफ सुद्धा मिळवता येणार आहे.
या स्मार्टफोनसाठी कंपनीने 6.5 इंचाचा एचडी+डिस्प्ले दिला आहे. याच्या स्क्रिनचे रेजोल्यूशन 720X1600 पिक्सल आहे. हा स्मार्टफोन octa-core MediaTek Helio G70 प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये देण्यात आलेला स्टोरेज मायक्रोएसडी कार्डचा वापर करुन वाढवता येणार आहे.(Redmi 9 Launched In India: रेडमी कंपनीचा नवा स्मार्टफोन Redmi 9 भारतात 8,999 रुपयात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स)
रिअलमी नार्जो 10A स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 12MP आहे. तर 2MP चा सेकेंडरी सेंसर आणि 2MP चा मॅक्रो सेंसर सुद्धा दिला आहे. त्याचसोबत व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी यामध्ये 5MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. Realme Narzo 10A स्मार्टफोनमध्ये युजर्सला 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी देणार असुन जी रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह येणार आहे.