PUBG Mobile India लवकरच होणार लॉन्च; कंपनीने शेअर केला टीझर (Watch Video)

पबजी मोबाईल इंडिया हा लोकप्रिय गेम लवकरच भारतात पुन्हा दाखल होणार आहे. याचा ऑफिशियल ट्रेलर कंपनीने अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. त्यामुळे पबजी प्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.

PUBG (Photo Credits: PUBG)

पबजी मोबाईल इंडिया (PUBG Mobile India) हा लोकप्रिय गेम लवकरच भारतात पुन्हा दाखल होणार आहे. याचा ऑफिशियल टीझर (Official Teaser) कंपनीने अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. त्यामुळे पबजी प्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. थोड्याफार बदलांसह पबजी गेम पुन्हा भारतात दाखल होणार आहे. भारतीय कायद्यांची पूर्तता करण्यासाठी क्राफ्टनने (Krafton)  नवीन भागीदारांशी केलेल्या करारानंतर हा गेम पुन्हा रिलीज होणार आहे. कमबॅक पूर्वी कंपनीने गेमचा ऑफिशियल टीझर शेअर केला आहे.

या टीझरमध्ये तुम्ही पाहू शकाल की, पबजी बॅन झाल्याने काही पबजी प्रेमी नाराज आहेत. अगदी कंटाळले आहेत आणि व्हिडिओ शेवटी एक मेसेज दिसतो, 'चिकन डिनर मीस करताय? पबजी मोबाईल इंडिया लवकरच येत आहे.' मात्र या टीझरमध्ये पबजी गेम भारतात नेमका कधी दाखल होणार याची तारीख सांगण्यात आलेली नाही.

मागील आठवड्यात पबजी कॉर्पोरेशनने पबजी भारतात पुन्हा दाखल होणार असल्याची घोषणा केली. आता या गेमचे नाव 'PUBG Mobile India' असे असणार आहे. भारत सरकारशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी नावात बदल करण्यात आला आहे.

पहा टीझर:

 

View this post on Instagram

 

A post shared by PUBG MOBILE INDIA (@pubgmobile_in)

प्लेअर्सचा डेटा स्टोअर करण्यासाठी क्राफ्टननेही मायक्रोसॉफ्टबरोबर करार केला आहे. Azure Cloud Services च्या माध्यमातून हा डेटा साठवण्यात येईल. यामुळे युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवण्याची भारत सरकारची मागणी पूर्ण होण्यास  मदत होईल. (PUBG Addiction वरून वडीलांनी फटकारल्याच्या रागात मुलाने केले मानेवर गंभीर वार; बाप-लेकांची प्रकृती गंभीर)

PUBG played on Asus Zenfone Max Pro M1 6GB Variant (File Photo)

भारतीय गरजा लक्षात घेऊन या गेममध्ये बदल करण्यात आले असून गेममध्ये खरेदी करण्यासाठी स्थानिक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. भारतात गेमची esports ecosystem वाढवण्यासाठी आणि गेमचा अधिकाधिक प्रचार करण्यासाठी पबजी 100 कर्मचाऱ्यांच्या शोधात आहे. त्याचबरोबर कंपनीने भारतात तब्बल 100 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

दरम्यान, डेटा सुरक्षिततेचे कारण देत भारतात पजबी सह इतर 117 चायनीज अॅपवर बंदी घालण्यात आली होती. परंतु, आता पबजी मोबाईल इंडिया च्या कमबॅकची चाहत्यांना प्रतिक्षा आहे आणि लॉन्चिंगनंतर गेमला मिळणारा प्रतिसाद पाहणे, औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now