अनेकांच्या मृत्यूस, घटस्फोटास जबाबदार असलेला PUBG Game ठरला जगात सर्वाधिक कमाई करणारा गेम; जाणून घ्या किती कोटी कमावले
मार्च 2018 मध्ये लॉन्च झालेल्या या गेमचे आतापर्यंत 10 करोडपेक्षा अधिक युजर्स झाले आहेत. मागच्या वर्षेही या गेम ने गेमिंगच्या दुनियेतील दोन महत्वाचे पुरस्कार पटकावले होते.
सध्या देशात दोन लाटा वाहत आहेत, एक म्हणजे मोदी लाट आणि दुसरी म्हणजे पबजी (PUBG) लाट. अल्पावधीतच तमाम तरुणाईला वेडे करणाऱ्या या गेममुळे अनेक युवकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर अनेकांचे मानसिक संतुलन बिघडले. तरुणाईचा फोकस ढळन्यास कारणीभूत ठरलेल्या या गेमवर बंदी आणावी अशी मागणी अनेकवेळा केली गेली, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. आता या गेमने जगात सर्वात जास्त कमाई करत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
सध्या 'पबजी मोबाइल' आणि त्याची नवीन आवृत्ती 'गेम फॉर पीस' (Game For Peace) ही फारच लोकप्रिय ठरत आहे. यामुळे चीनच्या इंटरनेट पॉवरहाउस टेन्सेंटने एका दिवसात तब्बल 48 लाख डॉलर्सपेक्षा अधिक कमाई केली आहे. या विक्रमासह हे जगातील सर्वात जास्त कमाई करणारे अॅप ठरले आहे. मोबाइल अॅप इंटेलिजन्स कंपनी सेंसर टॉवरच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. (हेही वाचा: Google Play वर PUBG सुपरहिट ! Best Game of 2018 सोबत अन्य 2 किताब पटकावले)
या अॅपची एप्रिलमध्ये सर्वात जास्त कमाई नोंदवण्यात आली होती, मात्र मेमध्ये दोन्ही व्हर्जन मिळून 14.6 कोटी डॉलर्सची कमाई झाली. ही कमाई एप्रिलच्या तुलनेत तब्बल 126 टक्के जास्त आहे. PUBG Mobile Season 6, हा 15 मे रोजी संपला होता आणि 17 मे पासून 7 वा सीझन सुरु झाला. पबजी नन्तर दुसऱ्या स्थानावर ‘ऑनर्स ऑफ किंग्ज’ हा गेम आहे. त्याने 12.5 कोटी डॉलर्स इतकी कमाई केली आहे.
दरम्यान, गेमिंगच्या क्षेत्रात पबजी हा सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून ओळला जात आहे. मार्च 2018 मध्ये लॉन्च झालेल्या या गेमचे आतापर्यंत 10 करोडपेक्षा अधिक युजर्स झाले आहेत. मागच्या वर्षेही या गेम ने गेमिंगच्या दुनियेतील दोन महत्वाचे पुरस्कार पटकावले होते.