लोकप्रिय Google डूडल गेम 'लोतेरिआ' आज लॉकडाऊनचा कंटाळा दूर करण्यास मदत करणार, पहा हा मेक्सिकन कार्ड गेम नेमका खेळायचा कसा?
या गेमचं गूगल डुडल 2019 साली गूगलच्या होमपेजवर आणलं होतं.
कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात घरात बसून येणारा कंटाळा घालवण्यासाठी सध्या गूगलने काही जुन्या गेम्सची मालिका पुन्हा सुरू केली आहे. Popular Google Doodle Games सीरीजमध्ये आज जुना मेक्सिकन कार्ड गेम लोतेरिआ (Loteria)लॉन्च करण्यात आला आहे. या गेमचं गूगल डुडल 2019 साली गूगलच्या होमपेजवर आणलं होतं. आजचा डुडलवरचा गेम Loteria म्हणजे स्पॅनिशमध्ये लॉटरी. हा पत्त्यांप्रमाणे खेळला जातो. तुम्ही हा गेम एकटे किंवा तुमच्या मित्रांसोबत खेळू शकता. गूगल ब्राऊझरवर हा गेम मल्टिप्लेअर स्वरूपातदेखील खेळण्याची सोय आहे. रॅडम युजर्ससोबतही खेळला जाऊ शकतो. गूगलच्या डूडल गेम सीरीज मधला हा सातवा खेळ आहे. याआधी कोडिंग, क्रिकेट, फ़िशिंगर, रॉकमोर आणि गार्डन नोम हे गेम्स लॉन्च करण्यात आले होते.
कसा खेळाल हा Loteria गेम?
प्रत्येक प्लेअरला 16 वेगवेगळ्या चित्रांची कार्ड मिळतात. युजरला 4 चित्रांचा सिक्वेंस एका विशिष्ट स्वरूपात पूर्ण करायचा आहे. यामध्ये अनाऊंसरकडून 54 विविध कार्ड्स दाखवले जातात. 4 मॅचिंग इमेजेस मिळाल्यानंतर ते विशिष्ट पॅटर्नमध्ये टोकन बिन्स सोबत मार्क करायचे असतात. जेव्हा आधी हा गेम पुर्ण करेल तो जिंकला.
हा गेम 5 मेक्सिकन आणि मेक्सिकन अमेरिकन इलेस्ट्रेटर्सनी बनवला आहे. या डुडलमध्ये मेक्सिकन युट्युबर Luisito Comunica यांनी कार्ड गेम अनाऊंसरची भूमिका बजावली आहे. मेक्सिकोमध्ये हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो.
सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये क्वारंटीन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या या विचित्र परिस्थितीमध्ये पझल्स, बोर्ड गेम्स खेळत अनेकजण वास्तविक जगात आणि अगदी व्हर्च्युअल जगात देखील टाईमपास करत आहेत. 27 एप्रिल पासून जगभरात लोकांचा हा होम क्वारंटीनचा काळ सुसह्य व्हावा म्हणून खास डूडल गेम्सची सीरीज लॉन्च करण्यात आली आहे. यामुळे आज दिवसभर काय करायचं? या प्रश्नाला उत्तर मिळू शकतं.