Paytm बँकेत FD वर मिळेल 7% व्याज; IndusInd Bank सोबत भागीदारी करुन पेटीएमची युजर्ससाठी खास सुविधा

मात्र गेल्या काही काळापासून एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीफसी बँकांसमवेत अनेक बँकांच्या एफडी दरात घट झाली आहे.

Paytm (Photo Credits: IANS)

बचतीसाठी आपल्याकडे फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) हा पर्याय अगदी सर्रास वापरला जातो. मात्र गेल्या काही काळापासून एसबीआय (SBI), आयसीआयसीआय (ICICI), एचडीफसी (HDFC) बँकांसमवेत अनेक बँकांच्या एफडी (FD) दरात घट झाली आहे. अशात पेटीएमने (Paytm) ग्राहकांसाठी खास सुविधा आणली आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेत (Paytm Payments Bank) देखील एफडीची सुविधा असून तिथे ग्राहकांना 7% व्याजदर दिला जात आहे. पेटीएम बँकेला प्रत्यक्ष फिक्स्ड डिपॉझिटची सुविधा प्रदान करण्याची परवानगी नाही. त्यामुळे पेटीएम बँकेने इंडसइंड बँकेसोबत (IndusInd Bank) पार्टनरशिप केली आहे. परंतु, व्याजदर इंडसइंड बँक ठरवणार आहे. (Paytm करणार भारतातील मिनी अॅप डेव्हलपर्संना मदत; 10 कोटींच्या निधीची तरतूद)

7% व्याजदर, 13 महिने मॅच्युरिटी पिरियड

पेटीएम पेमेंट्स बँकेत एफडी चा मॅच्युरिटी पिरियड 13 महिन्यांचा असून त्यावर 7% व्याज दिले जात आहे. विशेष म्हणजे मॅच्युरिटी पिरेडच्या आधी एफडी मोडल्यास कोणताही दंड भरावा लागत नाही. तर एफडी 7 दिवसांच्या आत मोडल्यास त्यावर कोणताही व्याजदर मिळणार नाही. याबद्दलची माहिती पेटीएमच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा उपलब्ध आहे.

इतर बँकांचे व्याजदर:

# डीसीबी बँक- 6.95%

# आयडीफसी बँक- 6.75%

# येस बँक- 6.25%

# आरबीएल बँक- 6.75%

# Deutsche Bank- 6.25%

सध्या डिजिटल व्यवहारांना गती मिळाली असल्याने डिजिटल पेमेंट सर्व्हिसेस ग्राहकांसाठी नवनव्या सुविधा सुरु करत असतात. दरम्यान, 18 सप्टेंबर रोजी गॅमलिंग पॉलिसीच्या (Gambling Policies) नियमांचे उल्लंघन केल्याने गुगल प्ले स्टोअरवरुन पेटीएम (Paytm) आणि पेटीएम फर्स्ट गेम (Paytm First Games) हे अॅप्स हटवण्यात आले होते. मात्र काही वेळाने Paytm App पुन्हा डाऊनलोडिंगसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले. मात्र त्यानंतर पेटीएम-गुगलचा वाद सुरु झाला.

दरम्यान, पेटीएमने मिनी अॅप स्टोअर लॉन्च केले आहे. तसंच भारतातील गुगल मार्फत 30% चार्जेसला बळी पडणाऱ्या कमीत कमी 10 लाख मिनी अॅप्सना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तब्बल 100 कोटींच्या निधींची तरतूद करण्यात आली आहे.