OnePlus 8T 5G स्मार्टफोन दिला जातोय धमाकेदार डिस्काउंट ऑफर, जाणून घ्या किंमतीसह खासियत

OnePlus चा फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePluse 8T हा Amazon Special ऑफरमध्ये विक्रीसाठी लिस्ट करण्यात आला आहे. या ऑफरमध्ये फोन खरेदीवर धमाकेदार डिस्काउंट दिला जात आहे

OnePlus 8T (Photo Credits: OnLeaks)

OnePlus चा फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePluse 8T हा Amazon Special ऑफरमध्ये विक्रीसाठी लिस्ट करण्यात आला आहे. या ऑफरमध्ये फोन खरेदीवर धमाकेदार डिस्काउंट दिला जात आहे. तर वन प्लसचा हा स्मार्टफोन 120Hz Fluid डिस्प्ले सह येणार आहे. फोनमध्ये 65W चा अल्ट्रा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. OnePlus 8T स्मार्टफोनमध्ये सुपर स्टेबल मोड 4K व्हिडिओ सपोर्ट दिला आहे. फोनच्या खरेदीवर डिस्काउंट ऑफरसह एक्सचेंज ऑफर ही मिळणार आहे.(Vivo Y20A ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत)

OnePlus 8T 5G स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या वेरियंटची किंमत 42,999 रुपये आहे. तर 128GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरियंटची किंमत 45,999 रुपये आहे. फोन एचडीएफसी कार्डच्या माध्यमातून खरेदी केल्यास त्यावर 2 हजारांचा इंस्टंट डिस्काउंट दिला जाणार आहे. तसेच फोन 2024 रुपये प्रतिमहिना EMI ऑप्शनसह खरेदी करता येणार आहे. या व्यतिरिक्त फोनच्या खरेदीवर 10,600 रुपयांचा एक्सचेंज ऑफरचा ही लाभ घेता येणार आहे.

स्मार्टफोनच्या फिचर्स आणि स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 6.55 इंचाचा 120 Hz Fluid AMOLED डिस्प्ले दिला आहे. याचे रेज्यॉल्यूशन 2400X1080 पिक्सल आहे. फोन Qualcomm Snapdragon 865 SoC प्रोसेसरवर काम करणार आहे. तसेच Android11 ऑपरेटिंग सिस्टिमच्या Oxygen OS वर आधारित आहे. फोनमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा ही दिला आहे.(Xiaomi Mi1 10i भारतात Amazon India वर सेलसाठी होणार उपलब्ध, 5 जानेवारीला होणार लॉन्च)

वन प्लस 8टी 5जी स्मार्टफोनच्या रियर पॅनलवर फोटोग्राफीसाठी 48MP चा मुख्य कॅमेरा दिला आहे. तर 16MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 5MP मोनोक्रोम लेन्स असणारा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. फोनच्या कॅमेऱ्याची खासियत म्हणजे गरज पडल्यास तो स्वत:हून नाइटस्केप मोडवर स्विच होणार आहे. वन प्लस 8टी 5जी स्मार्टफोनसाठी 4500mAh ची बॅटरी दिली गेली आहे. जी 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, 15 मिनिटांच्या सिंगल चार्जमध्ये फोन संपूर्ण दिवस वापरता येणार आहे. फोनचे वजन 188 ग्रॅम आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now