Nokia ने लॉन्च केला 65 इंचाचा स्मार्ट टीव्ही, 6 ऑगस्ट पासून सेलसाठी ग्राहकांना होणार उपलब्ध

Nokia 65 Inch 4K LED स्मार्ट टीव्ही भारतीय बाजारात नुकताच लॉन्च करण्यात आला आहे.

Nokia 65 Inch 4K LED (Photo Credits-Twitter)

नोकिया (Nokia) कंपनीने त्यांचा स्मार्ट टीव्ही पोर्टफोलियओ मध्ये नवे टीव्हीचे मॉडेल सहभागी केले आहे. Nokia 65 Inch 4K LED स्मार्ट टीव्ही भारतीय बाजारात नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. जो कंपनीच्या अधिकृत वेबसाईट्ससह ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart येथे सेलसाठी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या स्मार्ट टीव्हीसाठी पहिला सेल येत्या 6 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. नोकिया कंपनीचा स्मार्ट टीव्ही अॅन्ड्रॉइड 9.0 आणि त्यावरील सर्व वर्जनला सपोर्ट करणार आहे.

Nokia Smart TV 65-inch या टीव्हीची भारतीय बाजारात किंमत 64,999 रुपये आहे. Flipkart युजर्सला तो No Cost EMI च्या ऑप्शनसह खरेदी करता येणार आहे. तसेच यावरील ऑफर्सबाबत बोलायचे झाल्यास Standard Chartered बँकेच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यास युजर्सला यावर 10 टक्के इंस्टैंट डिस्काउंट दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त RuPay डेबिट कार्डच्या पहिल्या ट्राजेक्शनवर 30 रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे.(ऐकावे ते नवलंच! बाजारात आला LED Face Mask, मोबाईलसारखा करू शकाल वापर; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये Video)

तसेच कंपनीच्या स्मार्ट टीव्ही मध्ये UHD डिस्प्ले दिला आहे. यासाठी स्क्रिन रेजोल्यूशन 2840X2160 पिक्सल असून 178 डिग्री View Angle सह येणार आहे. अन्य फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास स्मार्ट टीव्ही मध्ये View Angle एक्सपिरियंस उत्तम बनवण्यासाठी डॉल्बी व्हिजन आणि Intelligent Dimming सह येणार आहे. हा 1GHz PureX quad-core Cortex A53 लेस आहे.(TRAI चे ब्रॉडकास्टर्सला आदेश, येत्या 10 ऑगस्ट पर्यंत लागू होणार NTO 2.0)

तर काही दिवसांपूर्वी नोकिया 7.2 च्या खरेदीवर  ग्राहकांना आणखी एक स्मार्टफोन मोफत दिला जात होता. याशिवाय ग्राहकांना एक जबरदस्त जॅकेट देखील  देण्यात येणार होते. नोकिया 7.2 (6 जीबी रॅम) स्माटफोन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना कंपनी केस, जॅकेट, आणि नोकियाचा सी1 मोबाईल मोफत देत होती. ही ऑफर फिलिपिन्स ग्राहकांसाठी होती. फिलिपिन्स मध्ये हा फोन 15 हजार 990 पीएचपी म्हणजेच 285 यूरो इतकी आहे.