Coronavirus Lockdown दरम्यान 'गूगल पे' चं Nearby Spot फीचर देणार नजिकच्या किराणामाल व अत्यावश्यक सेवा पुरवणार्या दुकानांची माहिती
सध्या हे फीचर बंगळूरूमध्ये रोल आऊट करण्यात आलं असून लवकरच भारतातील इतर शहरांमध्येही सुरू केलं जाणार आहे.
कोरोना व्हायरस आऊटब्रेक झाल्यानंतर निम्म जग सध्या लॉकडाऊनमध्ये आहे. आणि या गोष्टी भारतासारखा लोकसंख्येच्या आकडेवारीत दुसर्या स्थानावर असणारा देश कसा अपवाद ठरू शकतो? आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवत असल्याचं जाहीर केलं आहे. सध्या भारतात संचारबंदी असल्याने नागरिकांना केवळ भाजीपाला खरेदी, औषधं आणि किराणामाल खरेदीसाठी बाहेर पडण्याची मुभा आहे. अशामध्येही नागरिकांना सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. दुकानदारही ग्राहकांशी कमीत कमी थेट संपर्क येईल असे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अनेकांनी ऑनलाईन पेमेंट किंवा डिजिटल पेमेंटचा पर्याय निवडला आहे. गूगल पे या गूगलच्या ऑनलाईन पेमेंटची सेवा देणार्या कंपनीने लॉकडाऊनमध्ये असणार्या भारतीयांची अडचण ओळखून आता 'Nearby Spot'हे नवं फीचर दिलं आहे. सध्या हे फीचर बंगळूरूमध्ये रोल आऊट करण्यात आलं असून लवकरच भारतातील इतर शहरांमध्येही सुरू केलं जाणार आहे.
'Nearby Spot'च्या माध्यमातून आता नागरिकांना त्यांच्या स्थानिक भागात जवळच सुरू असलेली किराणामालाची दुकाने आणि इतर अत्यावश्यक वस्तूंची दुकाने यांची माहिती मिळणार आहे. लवकरच हे गूगल पे वरील 'Nearby Spot'फीचर मुंबई, पुणे शहरातही सुरू होणार आहे. गूगल पेच्या या नव्या फीचरमुळे आता नागरिकांची अनावश्यक गर्दी टाळण्यास मदत होणार आहे. PM नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना Aarogya Setu App डाऊनलोड करण्याचे केले आवाहन; जाणून घ्या या अॅपच्या मदतीने कोरोना संशयित रूग्ण ओळखण्यास कशी होते मदत?
Maharashtra Lockdown : लॉकडाऊनमुळे आंब्याचेही हाल ; फळ विक्रीत ५०% घट : Watch Video
अद्याप कोव्हिड 19 वर औषध नसल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळूनच नागरिकांना या आजाराचा धोका कमी करण्यास मदत करणं भाग आहे. त्यामध्ये गूगल सारखी कंपनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना अधिक सुरक्षित व्यवहार आणि खरेदी करण्यासाठी मदत करणार आहे. दरम्यान ई कॉमर्स साईटवरील बिग बास्केट, ग्रोफर्स यांच्यासोबत आता स्विगीदेखील जवळच्या भागात अॅपच्या मदतीने किराणामाल घरपोच देण्यासाठी कॉन्टॅक्ट लेस डिलेव्हरीची सोय देत आहे.