Moto G9 Power स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत
मोटोरोला (Motorola) कंपनीने त्यांचा लेटेस्ट स्मार्टफोन Moto G9 Power स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनचा सेल 15 डिसेंबर पासून फ्लिपकार्टवर होणार आहे. मोटो जी9 पॉवर मध्ये 6000mAh ची बॅटरी आणि अन्य काही खास फिचर्स ही युजर्सला मिळणार आहे.(Moto G 5G भारतात लॉन्च; जाणून घ्या सर्वात स्वस्त 5G फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स)
कंपनीच्या या स्मार्टफोनसाठी 720X1640 पिक्सल रेज्यॉल्यूशसह 6.8 इंचाचा एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला आहे. फोन 20:5:9 आस्पेक्ट रेश्योसह येणार आहे. प्रोसेसरसाठी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 662 SoC चिपसेट दिला आहे. ड्युअल नॅनो सिम सपोर्ट करण्यासाठी हा फोन अॅन्ड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे.(Nokia 2.4 स्मार्टफोन भारतात लॉन्च, 4500mAh च्या दमदार बॅटरीसह मिळणार 'हे' फिचर्स)
Tweet:
फोटोग्राफीसाठी या फोनध्ये तीन रियर कॅमेरा दिला आहे. यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरासह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि एक 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सल कॅमेरा मिळणार आहे. रियर फिंगरप्रिंट सेंसर लेन्सच्या या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. जी 20 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4G LTE, वायफाय 802.11ac, ब्लुटूथ वर्जन 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी, युएसबी टाइप सी आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे ऑप्शन दिले आहेत.