Moto G22 लवकरच भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशनबद्दल अधिक
फोन निर्माती कंपनी मोटोरोला लवकरच आपला स्मार्टफोन Moto G22 फोन भारतात लॉन्च करणार आहे. कंपनीने सध्या हा स्मार्टफोन युरोपात लॉन्च केला आहे. कंपनीच्या मोटो जी22 मध्ये युजरला मीडियाटेक हिलियो जी37 चीपसेट दिसून येणार आहे.
फोन निर्माती कंपनी मोटोरोला लवकरच आपला स्मार्टफोन Moto G22 फोन भारतात लॉन्च करणार आहे. कंपनीने सध्या हा स्मार्टफोन युरोपात लॉन्च केला आहे. कंपनीच्या मोटो जी22 मध्ये युजरला मीडियाटेक हिलियो जी37 चीपसेट दिसून येणार आहे. या फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस मॅक्सविजन एलसीडी डिस्प्ले दिला जाणार आहे. तसेच प्रायमरी सेंसर 50 मेगापिक्सचा असणार आहे. या फोनमध्ये तुम्हाला 5,000mAh ची मोठी बॅटरी मिळणार आहे.(Google कडून Android App साठी Dark Mode ची चाचणी, जाणून घ्या खासियत)
युरोपीय बाजारात मोटो जी22 ची किंमत 169.22 यूरो (14,270 रुपये) आहे. हा स्मार्टफोन 4GB+64GB स्टोरेज वेरियंट मध्ये येणार आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, हा लवकरच भारतात सुद्धा लॉन्च केला जाणार आहे. कंपनीने फोन तीन कलर वेरियंट्स कॉसमिक ब्लू, आइसबर्ग ब्लू आणि पर्ल व्हाइटमध्ये लॉन्च केला आहे.
Moto G22 एक डुअल नॅनो सिम फोन आहे. फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले मिळणार आहे. यामध्ये MaxVision टेक्नॉलॉजी आणि LCD पासून तयार केला आहे. याचा रिफ्रेश रेट 90 हटर्जचा असून पिक्सल डेंसिटी 268ppi आहे. प्रोसेसरच्या आधारावर फोनमध्ये ऑक्टाकोर MediaTek Helio G37 चिपसेट मिळणार आहे. जो 4 जीबी रॅम आणि 64GB स्टोरेजसह येणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G LTE, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक दिला गेला आहे. यामध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, फेशिअल रिकग्निशन, प्रॉक्सिमिटी सेंसर, एम्बियंट लाइट सेंसर, एक्सिलरोमीटर, जायरोस्कोप, ई-कम्पास, जीपीएस, ए-जीपीएस सारखे सेंसर मिळणार आहेत.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. तसेच यामध्ये f/1.8 अपर्चर लेन्स देखील मिळेल. हे 8-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड शूटर आणि f/2.4 अपर्चरसह 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह आहे. चौथा सेन्सर म्हणून 2-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर देखील देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16-मेगापिक्सेल कॅमेरा आहे, जो होल-पंच कटआउटमध्ये बसवला आहे.(OnePlus कडून स्मार्ट टीव्ही सीरिज लॉन्च, जाणून घ्या फिचर्सबद्दल अधिक)
Moto G22 मध्ये 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे. तथापि, बॉक्समध्ये फक्त 10W चा चार्जर उपलब्ध आहे. हे वॉटर रेसिस्टंट डिझाइनसह येते. फोनचे डायमेंशन 163.95x74.94x8.49mm आणि वजन 185 ग्रॅम आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)