Moto G 5G स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्स

स्मार्टफोन निर्माती कंपनी मोटोरोला यांचा बहुचर्चित फोन Moto G 5G अखेर युरोपमध्ये लॉन्च केला आहेय हा फोन डिझाइनच्या लूक नुसार आकर्षक दिसण्यास आहे. फोनच्या बॅक पॅनलवर मोटोरोला फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.

Motorola G 5G (Photo Credits-Twitter)

स्मार्टफोन निर्माती कंपनी मोटोरोला यांचा बहुचर्चित फोन Moto G 5G अखेर युरोपमध्ये लॉन्च केला आहेय हा फोन डिझाइनच्या लूक नुसार आकर्षक दिसण्यास आहे. फोनच्या बॅक पॅनलवर मोटोरोला फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. फिचर बद्दल बोलायचे झाल्यास Moto G 5G साठी 5000mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. या व्यतिरिक्त नव्या एचडी डिस्प्लेसह एकूण चार कॅमेऱ्यांचा सपोर्ट दिला आहे. तर स्मार्टफोनच्या फिचर्ससह किंमतीबद्दल अधिक येथे जाणून घ्या.(Micromax In Note 1 आणि Micromax In 1b स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह किंमतीबद्दल अधिक)

Moto G 5G स्मार्टफोन 4 जीबी आणि 6 जीबी रॅम ऑप्शनमध्ये उपलब्ध करुन दिला आहे. या फोनच्या 4जीबी वेरियंट्सची किंमत 299 युरो 26,150 रुपये आहे. मात्र याच्या 6जीबी रॅम असलेल्या वेरियंटची किंमत स्पष्ट केलेली नाही. हा डिवाइस Frosted Silver आणि Volcanic Grey रंगात खरेदी करता येणार आहे.

कंपनीचे असे म्हणणे आहे की, मोटो जी 5जी स्मार्टफोन येणाऱ्या दिवसात एशिया, लॅटिन अमेरिकासह मध्य पूर्व मध्ये उपलब्ध करुन दिला जाणार आहे. सध्या कंपनीकडून हा स्मार्टफोन भारतात कधी उतरवला जाणार हे सांगण्यात आलेले नाही. स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास हा फोन अॅन्ड्रॉइड 10 आउट ऑफ द बॉक्स ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. या व्यतिरिक्त डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यामध्ये पहिला 48MP चा प्रायमरी, दुसरा 8MP वाइड-अँगल आणि तिसरा 2MP ची मॅक्रो लेन्स आहे. त्याचसोबत फोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.(Yahoo Mobile ने लॉन्च केला पहिला स्मार्टफोन ZTE Blade A3Y, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन)

अन्य फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास मोटो जी 5जी मध्ये 6.7 इंचाचा मॅक्स विजन LTPS एफएचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रेज्यॉल्यूशन 2400X1080 पिक्सल आहे. तसेच फोनच्या उत्तम परफॉर्मेन्ससाठी snapdragon 750G प्रोसेसरवर काम करणार असून 128जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. त्याचसोबत फोनमध्ये 5जी, वायफाय, ब्लुटुथ 5.1, एनएफसी, 3.5mm हेडफोन जॅक आणि युएसबी टाइप- सी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फिचर्स दिले आहेत. फोनचे वजन 212 ग्रॅम असून त्याला IP52 रेटिंग मिळाली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now