Maruti Suzuki च्या प्रीमियम कारवर जुलै महिन्यात तब्बल 40 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट

त्यामुळे ग्राहक नवी कार खरेदी करण्यासाठी पुढे येत असल्याने कंपनीचा ही सेल होत आहे. याच दरम्यान आता देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या मारुती सुझुकी यांनी त्यांची प्रीमियम डिलरशीप Nexa येथून विक्री केल्या जाणाऱ्या कारवर 40 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे.

Maruti Suzuki (Photo Credits-Twitter)

कार कंपन्या सध्या सातत्याने डिस्काउंट ग्राहकांना उपलब्ध करुन देत आहेत. त्यामुळे ग्राहक नवी कार खरेदी करण्यासाठी पुढे येत असल्याने कंपनीचा ही सेल होत आहे. याच दरम्यान आता देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या मारुती सुझुकी यांनी त्यांची प्रीमियम डिलरशीप Nexa येथून विक्री केल्या जाणाऱ्या कारवर 40 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. तर जाणून घ्या जुलै महिन्यात मारुतीच्या कोणत्या प्रीमियम कारवर किती रुपयांची सूट ग्राहकांना दिली जात आहे.(Maruti Suzuki S-Cross चे पेट्रोल मॉडेल येत्या 5 ऑगस्टला होणार लॉन्च, जाणून घ्या खासियत)

मारुतीची एन्ट्री-लेव्हल प्रीमियम कार इग्निस (Ignis) वर या महिन्यात 40 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. ही ऑफर कारच्या Zeta वेरियंट सोडून अन्य सर्व वेरियंटसाठी उपलब्ध आहे. यामध्ये 20 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळणार आहे. तर Zeta वेरियंटवर 30 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे. त्यात 10 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांचा एक्सेचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जाणार आहे. मारुती इग्निसची सुरुवाती किंमत 4.89 लाख रुपये आहे.

मारुतीच्या Baleno या पॉप्युलर प्रीमियम हॅचबॅकवर जुलै महिन्यात 35 हजार रुपयांतच्या डिस्काउंटचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. जो Sigma वेरियंटवर आहे. यामध्ये 15 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15 हजारांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजारांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळणार आहे. कारच्या अन्य वेरिंयंट्सवर डिस्काउंट 30 हजार रुपयांपर्यंत आहे. त्यात 15 हजारांऐवजी 10 हजार रुपये दिला जात आहे. बलेनो याची किंमत 5.63 लाखांपासून सुरु आहे.

Ciaz या कारवर जुलै महिन्यात 35 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. हा डिस्काउंट Alpha वेरियंट सोडून अन्य सर्व मॉडेल्सवर आहे. यामध्ये 10 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटचा सहभाग आहे. सियाच्या Alpha वेरियंटवर 25 हजार रुपयापर्यंत सुद्धा फायदा मिळवता येणार आहे. या वेरियंटवर कॅश डिस्काउंट उपलब्ध नाही आहे. सियाज याची सुरुवाती किंमत 8.32 लाख रुपये आहे.(पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त? भारतातील 'या' दमदार CNG कारबाबत जरुर जाणून घ्या)

मारुती कंपनीच्या XL6 या प्रीमियम MPV वर 20 हजार रुपयांपर्यंतचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. जो एक्सचेंज बोनसच्या रुपात उपलब्ध आहे. याची सुरुवाती किंमत 9.84 लाख रुपये आहे. मारुती नेक्सावरील कारवर देण्यात येणारी ऑफर, वेरियंट, कलर, शहर आणि डिलरशीपच्या आधारावर विविध असू शकते. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी ग्राहकांना डिलरशिप सोबत संपर्क साधू शकता. येथे देण्यात आलेली कारच्या किंमती या एक्स शोरुममधील आहेत.